गोंदिया : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातून फक्त माजी खासदार व माजी आमदार यांचीच वर्णी लागली आहे. त्यांच्या जोडीला इतर म्हणून माजी जि.प.अध्यक्ष व माजी जि.प. उपाध्यक्ष अशा एकूण सातजणांची निवड झाली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली.
गोंदिया जिल्ह्यातून विशेष निमंत्रित म्हणून माजी आमदार रमेश कुथे हे एकमात्र नाव असून कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले, माजी आमदार रमेश कुथे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे व माजी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाने यांचीच वर्णी लागलेली आहे. काँग्रेसमधून २०१९ च्या निवडणुकीत भाजपात प्रवेश केलेले गोपालदास अग्रवाल यांना पराभूत झाल्यानंतर ही संधी देण्यात आलेली आहे.
हेही वाचा – प्रवाशांचा संताप, नागपूर विमानतळावर पहाटे काय घडले?
जिल्ह्यातून एकमात्र महिला कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी जि. प. उपाध्यक्ष रचना गहाने यांना ही संधी देण्यात आलेली आहे. आज जाहीर झालेल्या कार्यकारिणीमुळे वर्षंनुवर्षांपासून आपली प्रतीक्षा यादी संपणार अशी अपेक्षा असलेल्यांचा हिरमोळ झालेला आहे. आजच्या यादीने बऱ्याच वरिष्ठांचे स्वप्न भंगले असल्याची वाच्यता गपचूपरित्या व्यक्त केली आहे.