लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा: शासकीय आश्रम व निवासी शाळेच्या वसती गृहात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेत फारसे यश मिळत नसल्याचे चित्र आहे. पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने हे चित्र असल्याचे शासनाचे निरीक्षण आहे. आता त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आदिवासी विभागाने खास कार्यक्रम घेतला आहे.

अभियांत्रिकी,वैद्यकीय, विधी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करवून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दहावी नंतर दोन वर्षाच्या कालावधीत नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहायाने अश्या प्रवेश परीक्षेच्या तयारीची ही योजना आहे.

हेही वाचा… बालरोग तज्ज्ञांची शनिवारपासून नाशिकॉन २०२३ परिषद; राज्यातून ४०० हून अधिक तज्ज्ञांचा सहभाग

आदिवासी विभागांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा यापैकी कोणत्याही एका शाळेत एक तुकडी वैद्यकीय व एक तुकडी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारी साठी तयार करण्यात येईल. प्रत्येक तुकडीत तीस विद्यार्थी राहणार असून त्यांना अकरावी व बारावीत शिकण्यास प्रवेश दिल्या जाणार आहे. प्रत्येक अपर आयुक्त कार्यालय स्तरावर शाळा निवड होणार आहे. त्यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity for scheduled tribe students to become doctors engineers pmd 64 dvr