‘एमपीएससी’चा सकारात्मक निर्णय

देवेश गोंडाणे

rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
dispute in Urans Mahavikas Aghadi in assembly election 2024
उरणमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी
vanchit bahujan aaghadi manifesto for maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभा निवडणुकीसाठी वंचितचे ‘जोशाबा समतापत्र’ प्रसिद्ध, नक्की काय म्हंटले त्यात !

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नुकताच एक सकारात्मक निर्णय घेतला आहे. शासकीय सेवेत असणारे अनेक उमदेवार हे मोठे पद मिळावे म्हणून पुन्हा ‘एमपीएससी’च्या विविध परीक्षा देत असतात. मात्र, या प्रयत्नामध्ये त्यांना वर्तमानातील पदापेक्षा छोटे किंवा समकक्ष पद मिळत असल्यास त्यांना ही निवड नको असते. अशावेळी ही निवड रद्द (ऑप्टींग आऊट) करण्यासाठी आयोगाकडे अर्ज करता येणार आहे. यामुळे आता अशा जागेवर  कमी गुण असणाऱ्या दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक उमदेवारांचा लाभ होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.

राज्य सेवा  परीक्षेमध्ये सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड केली जाते. मात्र, सगळय़ाच उमेदवारांना अधिकचे गुण नसल्याने त्यांना हे पद मिळणे शक्य नसते. त्यामुळे गुणांच्या क्रमवारीनुसार उमेदवारांची विविध पदांवर निवड केली जाते. ज्या उमेदवारांना वरच्या पदावर संधी मिळत नाही ते उमेदवार यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यासाठी दरवर्षी होणाऱ्या ‘एमपीएससी’ परीक्षेला सामोरे जातात.  मात्र, यामध्येही अनेकदा त्यांना फारसे यश मिळत नाही. अनेकांना समकक्ष पद किंवा त्यापेक्षा खालच्या दर्जाचे पदही मिळत असते. त्यामुळे हे उमेदवार ते पद स्वीकारत  नाहीत. परिणामी, त्या पदावर कुणीही रूजू होत नसल्याने ती जागा रिक्त राहते. या प्रकारामुळे कमी गुण असणाऱ्या उमेदवारांनाही आपली संधी गमवावी लागते.  ‘एमपीएससी’ने यावर तोडगा काढत सकारात्मक निर्णय घेतला आहे. यामुळे आता ज्या उमेदवारांची निवड ही समकक्ष किंवा छोटय़ा पदावर झाली असेल त्यांना आयोगाकडे  निवड रद्द करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यांच्या या अर्जामुळे आयोग त्या जागेवर त्याच्या खालोखाल गुण असणाऱ्या उमेदवाराला संधी देणार आहे.