लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ अधीवेशनाच्या चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहावर मोर्चा काढला. संविधान चौकातून हा मोर्चा काढण्यात आला.

विधिमंडळ सभागृहाच्या मुख्य द्वारातून विधानभवनाकडे प्रवेश करताना बाबासाहेब का अपमान नही सहेगा हिंदुस्तान अशा जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस व महाविकास आघाडीचे आमदार सभागृहांच्या पायऱ्या जवळ पोहोचले व येथे जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानपरिषद विधान भवन परिसर दणाणून सोडला. यावेळी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार निळ्या टोप्या व दुपट्टे परिधान करून होते.

आणखी वाचा-राजभवनातील शपथविधी सोहळा ‘त्या’ च्या साठी ठरला जीवघेणा..

बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर असा निरंतर जप देखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला. एकच साहेब बाबासाहेब अशा घोषणा ही यावेळी देण्यात आल्या. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अभिजीत वंजारी , भाऊ जगताप, सचिन अहिर, नितीन राऊत , शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, वरून सर्देसाई, रोहित पवार , गीता गायकवाड , भास्कर जाधव इतर आमदार उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition angry over amit shahs controversial statement about dr babasaheb ambedkar mnb 82 mrj