लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: विधानसभा अध्यक्षांनी माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेता म्हणून घोषणा केल्यानंतर विधानसभेत पदभार स्वीकारत असतानाच विधानसभेत चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध केला म्हणून चिमूर क्रांती नगरीत वडेट्टीवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. वडेट्टीवार यांच्या निषेधाचे प्रतिबिंब समाज माध्यमात देखील उमटले.

नविन महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकित चिमूर, ब्रम्हपुरी, नागभिड,सिंदेवाही व सावली या तालुक्या करीता चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मीतीचा निर्णय घेण्यात आला. या विषयी २ आगस्टला विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सोईचे नसल्याचे वक्तव्य केले. याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारीत झाल्याने चिमूर क्रांती भुमित असंतोष वाढला असुन समाज माध्यमावर वड्डेटिवारांच्या निषेधाचे बॅनरच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा-यवतमाळातील ‘कॉमनमॅन’ने घेतला मोकाळा श्वास! अनेक वर्षांपासून नगर परिषद इमारतीत होता धूळ खात

चिमूर क्रांती जिल्हा निर्माण व्हावा याची मागणी गेली पाच दशका पासुन केल्या जात आहे. याच भावणीक मुद्दाला हात घालुन प्रत्येक राजकिय नेत्यांनी क्रांती जिल्हा निर्मीतिचे फक्त लॉलीपॉप दाखवुन सत्ता मिळविली. स्वांतत्रसंग्राम सैनिक काळे गुरुजीच्या भाषेत चिमूरची भोळी जनताही त्यांच्या लॉलीपॉप भुलली. तुम्ही आमदार द्या आम्ही जिल्हा देतो असे स्वप्न दाखविण्यात आले. तर काहींनी जिल्हा नाही केला तर आमची गाढवावरून धिंड काढा असे सांगीतले. जिल्हा मागणीच्या मोर्चाला हिंसक वळण लागुन ५ जानेवारी २००२ मध्ये तहसील कार्यालय जाळण्यात आले. मात्र चिमूरला कधी अतिरीक्त जिल्हाधिकारी कार्यालय तर कधी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मीतीच्या घोषणेतच बोळवण केली.

विधानसभा २०१९ निवडणुक पुर्व १४ जुलैला चिमूर येथे काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात तत्कालिन तथा वर्तमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सत्कार कार्यक्रमाला उत्तर देताना माझ्या राजकिय क्षेत्राची पायाभरणी या क्रांती भुमितच झाली असुन या क्रांती भुमिचे उपकार माझ्यावर असल्याचे वडेट्टिवार यांनी सांगीतले होते. १६ आगस्ट २०२० मध्ये वडेट्टीवार पालकमंत्री असताना चिमूर येथे क्रांती जिल्ह्या बाबत जनमताच्या पाठीशी असल्याचे सांगीतले होते. तर आता विधानसभेत २ आगस्टला त्यांनी चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणे हे सोयीचे नसल्याचे सांगुण ब्रम्हपूरी, सिंदेवाही, नागभिड व सावली तालुक्यातील नागरीकासाठी खर्चिक असल्याचे सांगितले. तसेच जनभावनेचा विचार करून चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास ही चार तालुके जोडू नका असे स्पष्ट सांगीतले. ही त्यांची चिमूर क्रांती भुमि विषयीची दुटप्पी भुमीकेची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारीत झाल्याने चिमूर क्रांती नगरीत त्यांचा सर्वच स्तरातून निषेध केल्या जात आहे.

आणखी वाचा- चंद्रपूर: घुग्घूस येथील १६९ भूस्खलनबाधितांना मिळणार शासकीय भूखंड; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला यश

दरम्यान बुधवारी नागभिड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली येथे चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला चार जिल्हे जोडू नये म्हणून नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. यावेळी जल समाधी आंदोलनावरून नागरिक व प्रशासन आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. सत्ता मिळविण्या करीता आज पर्यंत प्रत्येक नेता जिल्हा होणार असे खोटे आश्वासन देऊन जनतेचा भावणीक खेळ करीत आहे.-डॉ.सतिश वारजुकर,चिमुर विधानसभा काँग्रेस पक्ष समन्वयक