लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुलढाणा: अस्मानी सुलतानीचा जबर तडाखा बसलेल्या लाखो शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. त्यामुळे वाटल्यास विकासमांचा निधी वर्ग करून आणि निकषांचा बाऊ न करता मदत करा. असे न केल्यास शेतकरीच काय आम्ही देखील हातात दगड घेऊ. कायदा-बियदा जुमानणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

ना. वडेट्टीवार यांनी आज गुरुवारी ( दि ३०) सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ येथील पिकनुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. यानंतर निवडक माध्यमांशी बोलतांना त्यांनी राज्य सरकारला वरील शब्दात खडे बोल सुनावले. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस असा चोहोबाजूनी संकटात अडकला आहे. मानसिक, आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. पीकविमा कंपन्यांची मस्ती वाढली असून ते शेतकऱ्यांशी अडवणूक करीत आहे.

आणखी वाचा-‘वाईन महोत्सव’ २ डिसेंबरपासून; नाशिकच्या द्राक्षांपासून निर्मित वाईनची मजा नागपुरात घेता येणार

भयावह स्थितीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या लाखो शेतकऱ्यांना तात्काळ तेही निकषांपलीकडे जाऊन मदत करणे काळाची गरज आहे. सरकार नुसतेच निकष निकष करीत बसले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. सरकार असेच ढिम्म राहिले तर शेतकरी हातात दगड घेतील, त्यांच्या समवेत आम्ही देखील हातात दगड घेऊ असा परखड इशारा वडेट्टीवार यांनी दिला. तेंव्हा आम्ही कायद्याची देखील तमा बाळगणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.

शेतकरी वाचला पाहिजे

राज्य सरकारने शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदत, भरपाई, पीक विम्याची रक्कम तातडीने देणे आवश्यक आहे. उधोगपतींचे करोडोंचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांनी काय घोडे मारले? असा सवाल त्यांनी केला. नुकसान भरपाई देतांना पिकांची वर्गवारी करून मदत घ्यावी अशी सूचना त्यांनी केली. पिकांचा, फळांच्या एकरी लागवड खर्चात फरक असतो पण मदत सारखीच दिली जाते हे कितपत योग्य ? असा सवाल विरोधी पक्षनेत्याने यावेळी केला.यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे, शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव ,सरपंच निवृत्ती कठोरे यासह शेतकरी उपस्थित होते.