नागपूर : उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता, तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा होता. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे नाही, हे लोक जनतेला काय सांगणार? बेईमानी केली, पक्ष फोडला, जनतेसोबत दगाबाजी केली, हे सांगणार काय? अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
बीडमध्ये अजित पवारांच्या सभेत बळजबरीने आणलेली लोक होते. जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आज नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी फोडणऱ्याची आता जिरवायची, असा निर्णय जनतेने घेतला आहे. त्यामुळे त्यांचे आता काही खरे नाही.
प्रफुल्ल्ल पटेल यांच्याबाबत बोलताना म्हणाले, निवडणूक आयोग काय निर्णय देणार आहे, तो निर्णय गुप्त पद्धतीने झालाही असेल आणि तो निर्णय प्रफुल्ल्ल पटेल यांना माहीत असेल म्हणून ते तसे बोलत आहे.