नागपूर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या दबावात बेलापूर, नवी मुंबई येथील ५६०० चौ.मी. भूखंड श्री. संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल या ट्रस्टच्या नावाने वाटप करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा ‘लाडका मंत्री‘ असतो तेव्हा काय काय होऊ शकते बघा, अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

द इंडियन एक्सप्रेसने संजय राठोड यांचे प्रकरण उघडकीस आणले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये “अखिल भारतीय बंजारा सेवा संघ” (AIBSS) या संस्थेने बंजारा समाजासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली. या मागणीनुसार राज्य सरकारने नवी मुंबईतील सिडकोच्या ताब्यात असलेला ५,६०० चौरस मीटरचा भूखंड नोव्हेंबर २०२३ मध्ये “श्री संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट”ला दिला. मंत्री संजय राठोड या संस्थेचे प्रमुख आहेत.या वृत्तानंतर वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी एक्स वर पोस्ट करीत मुख्यमंत्री यांना जाब विचारला आहे.मुख्यमंत्र्यांच्या “लाडका मंत्री” योजनेचा आणखी एक लाभार्थी महाराष्ट्रापुढे आला आहे. तब्बल ५०० कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या एक रुपये प्रती चौरस मीटरच्या किंमतीत मिळू शकतो. दुसऱ्यांच्या जमिनी फुकटात हडपू शकतात.

40 thousand seats of public representatives are vacant in state
राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …

हेही वाचा >>>अजित पवार म्हणाले “तर …माझे पण  कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बोलू शकतात,”

१ नोव्हेंबर २०२३ रोजी, राज्याच्या नगरविकास विभागाने एक भूखंड श्री.संत डॉ.रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आल्याचा उल्लेख करणारा शासन निर्णय प्रसिद्ध झाला. मात्र मंत्रिमंडळाची कोणतीही मान्यता न घेता हा निर्णय झाल्याचे आता समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांचे लाडके मित्र मंत्री संजय राठोड यांच्या दबावात बेलापूर, नवी मुंबई येथील ५६०० चौ.मी. भूखंड श्री. संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल या ट्रस्टच्या नावाने वाटप करण्यात आला.मतांसाठी लाडक्या बहिणीला १५०० रुपये आणि लाडक्या मंत्र्याला ५०० कोटींचा भूखंड कवडीमोल भावात. महाराष्ट्राची लूट जिथे मिळेल तिथे कशी सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.मंत्री संजय राठोड यांच्या खासगी सचिवाने लिहिलेल्या पत्रावर सिडकोने भूखंड वितरीत केला. तसेच मंत्रिपदावर असलेल्या नेत्याच्याच संस्थेला भूखंड कसा काय दिला जाऊ शकतो? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. संजय राठोड यांनी मात्र हा भूखंड आपण परत देत असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader