नागपूर : नवी दिल्लीत जी-२० शिखर परिषदेची बैठक सुरू झाली आहे. या परिषदेला सदस्य देशांना निमंत्रित करण्यात आले. सोबतच भारतातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले. परंतु राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रवृत्ती हुकूमशाहीची आहे. त्यांना विरोधीपक्षाला सन्मान द्यायचा नाही, अशी टीका महाराष्ट्राच्या विधान सभेतील विरोधीनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते एका वृत्त संस्थेशी आज नागपुरात बोलत होते.
हेही वाचा… कुणबी समाजाचा सरकारविरोधात एल्गार! सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा
हेही वाचा… तोतया ‘सीआरपीएफ’ अधिकारी गजाआड; बनावट फेसबुक अकउंटद्वारे कशी फसवणूक करायचा? जाणून घ्या…
जी-२० परिषदेकरिता चार हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. इंडियाचे भारत असे नाव बदलण्यासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. लोकांच्या घामाचा, करातून गोळा झालेला पैशांची उधळन केंद्र सरकारने चालवली आहे. वास्तविक एवढा गाजावाजा करण्याची गरज नव्हती. पण, निवडणूक समोर असल्याने ते केले जात आहे. जी-२० परिषदेचे दरवर्षी यजमान बदलत असतात. दरवर्षी २० देशांपैकी कोणत्या ना कोणत्या देशात परिषद आयोजित केली जाते. यात एवढा देखावा करण्यासारखे काही नाही. परंतु राजकीय लाभ घेण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.