नागपूर : बिहार सरकारने सोमवारी (२ ऑक्टोबर) जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटीहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६३ टक्के लोक हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायाचे असल्याचे जनगणनेतून समोर आले आहे. ही आकडेवारी जाहीर होताच महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा… बुलढाणा: खामगावात कथित ‘गजानन महाराज’ प्रगटले! तोतया की बहुरुपी?, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा…
हेही वाचा… कंत्राटी नोकर भरतीविरोधात आंदोलने, ८२१ जागांवर बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठ्याच्या शासन निर्णय
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून भाजपने आज सेवाग्राम येथून ओबीसी जागरण यात्रेला प्रारंभ केला. त्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रहार केला. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणेची मागणी केली. त्याशिवाय ओबीसींचे आकडेवारी समोर येऊ शकत नाही. पण, केंद्र सरकार जातनिहाय जनगणा करण्याचे टाळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ओबीसी विरोधी असून त्यांचा जातनिहाय जनगणेला विरोध आहे. केंद्र सरकार मनुवादी सरकार चालवणार की, बहुजनवादी असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. तसेच भाजपने ओबीसी जागरण यात्रा काढून लोकांची डोळ्यात धुळफेक करू नये., जातनिहाय जनगणेपासून पळ काढू नये, टीकाही त्यांनी केली.