लोकसत्ता टीम

नागपूर : धान, कापूस, सोयाबीन या शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा या मुद्यावर विरोधकांचे विधीमंडळ परिसरात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विरोधकांनी एक आगळी वेगळी गोष्ट केली. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस होता. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत विरोधकांनी आवाज उठवला. शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते भाई जगताप आणि नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेतकऱ्यांना कमी हमीभाव मिळत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा मुद्दा मांडण्यात आला.

आणखी वाचा-पवार गटाच्या आमदारांची अजितदादाशी भेट, मिटकरी म्हणाले “विरोधी बाकावर जीव रमत नसल्याने…”

हातात कापूस आणि सोयाबीनची रोपे घेत आणि फलक दाखवत, आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. कापूस, सोयाबीन आणि धानसारख्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी त्यांनी केली. हे आंदोलन महाराष्ट्रातील वाढत्या कृषी संकटावर लक्ष केंद्रित करणारे ठरले, ज्यात विरोधकांनी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या डावलल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “सोयाबीन तेलाचे दर वाढले असताना शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या पिकासाठी नीचांकी दर मिळत आहे. हीच परिस्थिती कापूस आणि तांदळाच्या शेतकऱ्यांचीही आहे.”

आणखी वाचा-भुजबळांचे मंत्रीपद अन् त्याचे नागपूर कनेक्शन

सतेज पाटील म्हणाले, शेतकरी त्यांचा उत्पादन खर्चही भरून काढू शकत नाहीत आणि कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. “परिस्थिती गंभीर आहे. यंदाच्या पुरामुळे शेतमालाचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही,”. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. “शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. सरकारने प्रमुख पिकांसाठी हमीभाव लागू करावा आणि पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची वचने पूर्ण करावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader