नागपूर : शिंदे – फडणवीस सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या दिला आहे. याप्रसंगी दिवसभर सभागृहातील कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.

कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्‍यांवर आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा: बुलढाण्यात सर्व पक्षांना उभारी, सोबत आव्हानांची जाणीवही!

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आमदार पायर्‍यांवर आंदोलन करत आहेत. याप्रसंगी आदित्य ठाकरे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, वर्षा गायकवाड, विकास ठाकरे, रवींद्र रायकर, धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.