लोकसत्ता टीम

चंद्रपूर: गुरुकृपा व उज्वलचा प्रयोग फसल्यानंतर आणि अमृत पाणीपुरवठा योजना शहरातील ४० टक्के भागात पोहोचलेली नसतानाच महापालिका प्रशासक तथा आयुक्त व माजी पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे.

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
industry minister uday samant
हिंजवडी आयटी पार्कची कोंडी : उद्योगमंत्री उदय सामंत ‘ॲक्शन मोड’वर; अधिकाऱ्यांना दिले आदेश
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!

यापूर्वी दोन वेळा खासगीकरण अपयशी ठरले आहे. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे कोट्यवधीची थकबाकी आहे. अशा स्थितीत खासगीकरण करून पुन्हा चंद्रपूरकरांच्या तोंडचे पाणी पळवणे योग्य नाही. पाणीपुरवठ्याचे खासगीकरण रद्द करा, अशी मागणी दहा माजी नगरसेवकांनी लावून धरली आहे. येत्या ४८ तासात खासगीकरण रद्द केले नाही तर २१ जूनपासून आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

आणखी वाचा-नागपूर : मेडिकल रुग्णालयात शुल्क घोटाळा!, रुग्णाकडून ५०० रुपये घेऊन १२० रुपयांचीच नोंद

शहरातील इरई धरण, तुकूम जलशुद्धीकरण केंद्र, इरई नदी दाताळा हेडवर्क्स, रामनगर जलशुद्धीकरण, रामनगर जुने जलशुद्धीकरण केंद्र, बाबूपेठ सम्पवेल, बाबूपेठ जुने सम्पवेल या ठिकाणचे सर्व पंप, पॅनल, मोटार, व्हॉल्व इत्यादी पाणीपुरवठा योजनेतील सर्व यंत्रसामुग्री किंवा यंत्रसामुग्री-उपकरणे चालवण्यासाठी व देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली. मात्र, यापूर्वी पाणीपुरवठा योजनेतील ही सर्व कामे उज्ज्वल कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. उज्ज्वल कन्स्ट्रक्शनच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच महापालिकेलाही आर्थिक तोटा झाला. यानंतर महापालिकेच्या आमसभेत सर्वानुमते पाणीपुरवठ्याचे कंत्राट रद्द करून महापालिकेतर्फे पाणीपुरवठा योजना चालवण्याचा ठराव घेण्यात आला. यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले. मागील दोन वर्षांपासून महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. मात्र, आता अचानक या संपूर्ण योजनेसाठी एकाच कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या हेतूने महापालिका प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे.

या प्रस्तावित खासगीकरणाला माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत विरोध दर्शवला. पत्रपरिषदेला माजी नगरसेवक पप्पू देशमुख, दीपक जयस्वाल, अशोक नागापुरे, पुष्पा मुन, मंगला आखरे, नीलम सचिन आक्केवार, स्नेहल रामटेके, बंटी परचाके, आकाश साखरकर, राजू आखरे तसेच जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, मनीषा बोबडे, इमदाद शेख, अक्षय येरगुडे, प्रफुल बैरम, आकाश लोडे उपस्थित होते. खासगीकरण रद्द करा अन्यथा आंदोलन छेडू, असे उपायुक्त अशोक गराटे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही महापालिकेतील अनियमिततेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

विरोध करण्याचे आवाहन

विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहोचवण्याच्या हेतूने खासगीकरणाचा डाव महापालिका प्रशासनाने रचला आहे. याविरोधात पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्रितपणे विरोध करावा, असे आवाहन पत्रपरिषदेत करण्यात आले.

Story img Loader