नागपूर : ऑरेंज ऑलिम्पिक टीम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ऑरेंज ऑलिम्पिक स्पर्धा- २०२३ चे आयोजन २३ ते २८ नोव्हेंबर दरम्यान ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यंदा आपले शताब्दी महोत्सव साजरे करीत आहे. याच महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचे आयोजन ऑरेंज ऑलिम्पिक टीमच्या वतीने करण्यात आल्याची माहिती नागपूर विद्यापीठ क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिली.

या शालेय स्पर्धेत टेबलटेनिस, बॅडमिंटन आणि अॅथलेटिक्स या खेळाचा समावेश राहणार आहे. नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटना, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटना तसेच नागपूर जिल्हा टेबलटेनिस संघटनेच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व स्पर्धा नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहे.

11869 flights landed at nagpur international airport in 2024
बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ उपराजधानीत १२ महिन्यात ११ हजार ८६९ विमाने उतरली
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Navi Mumbai Police will open four new stations in six months due to airport expansion
नवी मुंबई पोलिसांना विस्ताराचे वेध, शहरात आणखी चार पोलीस ठाण्यांची वाढ
Finance Minister approves purchase of 25000 privately owned st buses in five years
गाव तेथे नवी एसटी धावणार; पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या ‘लाल परी’ बस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
RRB Group D Recruitment 2025 Online Notification OUT
सुवर्णसंधी! तरूणांनो लागा तयारीला, रेल्वेत सर्वात मोठी भरती; तब्बल ३२ हजार पदांची भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या
railway administration notice railway land notice to school action against school railway land Waldhuni railway land issue
कल्याणमधील वालधुनी येथील रेल्वेच्या जागेवरील शाळेला कारवाईची नोटीस; २८ जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याची सूचना
Arvind Kejriwal
“दिल्लीतल्या भाडेकरूंनाही मोफत वीज व पाणी देणार”, निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांची मोठी घोषणा

हेही वाचा >>>“सरकार आंधळं, बहिरं, बधीर झालेलं…”, मराठा आरक्षणावरून नाना पटोले आक्रमक

तळागाळातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे तसेच क्रीडा भावना जागृत व्हावी हाच ऑरेंज ऑलिम्पिकचे ध्येय असल्याचे मत ऑरेंज ऑलिम्पिकच्या संस्थापक व योग प्रशिक्षक दिव्या चावला आणि माजी रणजीपटू केतन कावरे यांनी व्यक्त केले. नागपूरमधील ५० हून अधिक शाळांमधून सुमारे एक हजार विद्यार्थी यात सहभागी होतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. स्पर्धेच्या भव्य आयोजनासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश काशीकर यांच्या मार्गदर्शनात बॅडमिंटन खेळाचे तर ॲड. आशुतोष पोतनीस यांच्या नेतृत्वात टेबल टेनिसचे आणि जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष गुरुदेव नगराळे यांच्या मार्गदर्शनात ॲथलेटिक्स खेळाचे नियोजन करण्यात येणार आहे.

Story img Loader