बुलढाणा: ‘ऑरेंज बेल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आज संत्रा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. रणरणत्या उन्हात पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वपक्षीय ‘आंबट गोड’ राजकीय जुगलबंदी रंगली. यामुळे औपचारिक कार्यक्रमाची रंगत वाढलीच पण उपस्थित शेकडो शेतकऱ्यांचे मनोरंजन देखील झाले.अभिता ऍग्रो इंडस्ट्रीज च्या संत्रा प्रक्रिया प्रकल्प अजपासून कार्यान्वित झाला. यावेळी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके, सीईओ सुनील शेळके, काँगेसचे जयश्री शेळके , ज्योती ढोकणे, प्रकाश पाटील,भीमराव पाटील, भाजपचे प्रमोद खोद्रे, शिवसेना उबाठा चे दत्ता पाटील, गजानन वाघ, राष्ट्रवादीचे राजू भोंगळ, सुनील कोल्हे आदी सर्वपक्षीय राजकारणी हजर होते. मात्र कार्यक्रम कोणताही असो नेते राजकीय विधाने करतातच याचा प्रत्यय या सोहळ्यातही आला. व्यासपीठावर संत्र्यांच्या पॅकिंग साठी आणलेले खोके ठेवण्यात आले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्याकडे कटाक्ष टाकून ज्योती ढोकणे म्हणाल्या की, ‘खोक्यांना पाहून मनस्वी आनंद झाला.
“शेतकऱ्याला बी खोके मिळायला पाहिजे…” संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात आंबट-गोड राजकीय जुगलबंदी!
'ऑरेंज बेल्ट' म्हणून प्रसिद्ध असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आज संत्रा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-03-2024 at 17:57 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Orange processing plant at sonala in sangrampur taluka which is orange beltscm 61 amy