नागपूर : लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने २८ ते ३० ऑक्‍टोबर या कालावधीत ‘एशियन सिट्रेस काँग्रेस २०२३’चे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील लिंबूवर्गीय पीक संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांची मांदियाळी राहील, अशी माहिती लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली.

‘‘केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर, एशिया पॅसिफिक असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, बॅंकॉक (थायलंड), कोरियन सोसायटी फॉर सिट्रस ॲण्ड सबट्रॉपिकल क्‍लायमेट फ्रूट्‍स, साउथ कोरिया यांच्या संयुक्‍त सहकार्याने हा कार्यक्रम होईल.

हेही वाचा – नागपूर : पतीच्या स्मृतीदिनी मृत पत्नीचे अवयवदान; तीन रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले

लिंबूवर्गीय फळ पीक हे उत्पादक, प्रक्रिया उद्योजकांसाठी आर्थिकस्रोत ठरला आहे. त्यामुळेच या क्षेत्रात नवसंशोधन, माहितीचे आदानप्रदान, खरेदीदार, विक्रेत्यांचे संमेलन, लिंबूवर्गीय फळपीक संशोधन, उत्पादन व बाजारपेठ या क्षेत्रातील आव्हाने आदी विषयांवर त्यात चर्चा होईल, असे
डॉ. घोष यांनी सांगितले.

हेही वाचा – नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणतात आंदोलन करा, मी पाठिंबा देतो; काय आहे समस्या, वाचा…

आयोजन समितीमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, उद्यानविद्या विज्ञान शाखेचे उपसंचालक डॉ. ए. के. सिंग, शास्त्रज्ञ निवड समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, संचालक डॉ. दिलीप घोष यांचा समावेश आहे.