लोकसत्ता टीम

नागपूर: जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या दिवशी संपात सहभागी झालेले बहुतांश कर्मचारी दुसऱ्या दिवशी बुधवारी कामावर परतले. त्यामुळे मुख्यालयासह झोन कार्यालयांतील थांबलेले कामकाज सुरळीत झाल्याचे चित्र होते. दरम्यान, संपावर न परतणाऱ्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपात इंटकशी संलग्नित नागपूर महापालिका कर्मचारी संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संपाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी तब्बल दहा हजार कर्मचारी सहभागी झाले होते. संपामुळे झोन कार्यालय, मुख्यालयातील अनेक महत्त्वाच्या विभागाची कामे ठप्प झाली होती. शहरातील चार झोनमधील करवसुली ठप्प झाली होती, त्यामुळे अनेकांना कर न भरता आला नाही. जन्ममृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता कर, नगररचना विभागाशी संबंधित कामांना सर्वाधिक फटका बसला होता. मार्च महिन्याची लगबग सुरू असल्याने या विभागात दररोज सर्वाधिक गर्दी असते. बुधवारी संपावर गेलेले किमान सहा ते सात हजार कर्मचारी परतल्याने कामकाज पूर्ववत झाले.

७५ टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर परतल्याने संपाचा दुसऱ्या दिवशी फारसा परिणाम जाणवला नाही, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यातच जे अजूनही संपावर परतले नाहीत अशा २१९ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही महापालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी दिली. ज्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे त्यांना चोवीस तासाच्या आत स्पष्टीकरण द्यावे, असेही पत्रास नमूद करण्यात आले.