चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या मनुस्मृती विचारांच्या शक्तीने देशाच्या राष्ट्रध्वजाचे महत्व कमी करण्याचा प्रकार सुरू आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवीत असताना देशद्रोही मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडें सारख्याकडून तिरंगा ऐवजी दुसरा ध्वज फडकवा, असा समाजात तेढ निर्माण करणारा विषारी संदेश पसरविल्या जात आहे. देशाला जीवन समर्पित करून बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या देशद्रोही मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडेला तुरुंगात डांबण्याऐवजी गुरुजी म्हणून सत्ताधारी विद्यार्थी सन्मान करीत आहेत, अशी टीका विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. महात्मा गांधींच्या विचारांची महानता या मनुस्मृती वाद्यांना काय कळणार, असेही वडेट्टीवार म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पवारांच्या हालचालींवर काँग्रेस लक्ष ठेवून, राजकीय अस्थिरता निर्माण होणार असेल तर.. – डॉ. नितीन राऊत स्पष्टच बोलले

चिमूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.पंतप्रधान मोदींनी हुकुमशाही धोरण लावण्यासाठी स्वायत संस्थांचा वापर करून पक्ष फोडाफोडींचे राजकारण सुरू केले आहे. राजकारणासाठी देवांच्या नावांचा वापर करून समाजाला जाती जातीत विभागले जात आहे यामुळे देशाची एकात्मता धोक्यात आली असून २०२४ ची स्वातंत्र्याची दुसरी लढाई साठी सर्वांनी सज्ज राहून राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी करावी असेही विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा >>> नागपुरात वाहतूक नियम मोडणाऱ्या ३ हजार वाहन चालकांवर कारवाई

चिमूर क्रांतीचा इतिहास अजरामर आज १६ आगस्ट चिमूर क्रांती दिनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे येऊन चिमूर क्रांतीतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, की १९४२ साली देशातील चिमुरात क्रांतीची पहिली ठिणगी पेटली. यात शहीद वीर क्रांतिकारक बालाजी रायपूरकर व त्यांच्या साथीदारांनी हाती शस्त्र नसताना देखील शस्त्रधारी इंग्रज अधिकाऱ्यांशी लढा दिला. या लढ्यात अनेक तरुणांना वीरमरण आले. हा चिमुरचा क्रांतिकारी  इतिहास स्वातंत्र्याच्या लढाईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला असून तो सदैव अजरामर राहील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organisation like rss continuing to diminish importance of the national flag says mla vijay wadettiwar rsj 74 zws
Show comments