येत्या शनिवारी नागपूर तरुणाईला फुटाळा तलावावर उपसिथत राहण्याची साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे. मतदान नोंदणी सोबत ‘इलेक्शन युथ फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते रात्री ७ पर्यंत होणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

हेही वाचा- शिकवणी वर्गात जाणारा तुमचा मुलगा सुरक्षित आहे का?

The High Court asked the Central Election Commission why the applications of the interested candidates were rejected print politics news
निर्धारित वेळेआधी इच्छुक उमेदवारांचे अर्ज का नाकारले? केंद्रीय निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची विचारणा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
election decision officer car fire, Disabled independent candidate,
दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली
Manoj Jarange Patil Maharashtra Assembly Election 2024
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंकडून काल मतदारसंघांची घोषणा, आज निवडणुकीतून माघार, आंतरवालीत रात्री काय घडलं?
buldhana constituency independent candidates in large numbers
बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात अपक्षांची ‘पेरणी’!
vidhan sabha election 2024
उमेदवारांच्या पारंपरिक प्रचारामुळे प्रिंटिंग व्यवसाय तेजीत
Prohibitor notices to 1032 criminal persons before assembly elections
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १,०३२ गुन्हेगारी व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटीस
Gopal Krishna Gokhale, Haribhau Apte,
मतदारांना ‘किंमत’ देणारे लोकप्रतिनिधी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील युवकांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने १९ नोव्हेंबर रोजी स्थानिक फुटाळा तलाव येथे दुपारी चार ते सात या वेळेत ‘इलेक्शन युथ फेस्टिवल’ साजरा करण्यात येणार आहे.

युवा उत्सवामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता निवडणूक विभागामार्फत नव मतदार (वय वर्षे १७ ते १९ वयोगटातील) यांचेकरिता मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘इलेक्शन युथ फेस्टीवल’ मध्ये वेगवेगळ्या खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात झुम्बा डान्स, लाईव्ह म्युझिकल मल्ल खांब प्रात्यक्षिक, टग ऑफ वॉर, बास्केटबॉल स्पर्धा यांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. फुटाळा म्युझिकल फाऊंटन शोचे निशुल्क आयोजन करण्यात येणार आहे. या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता प्रवेश निशुल्क आहे. कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवामध्ये इयत्ता ११ वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्याकरीता संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे महाविद्यालयामध्ये निवडणूक विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या प्रवेश पासेस प्राप्त करून घ्याव्यात.

हेही वाचा- नागपूर : विधिसभेतील पदवीधर मतदारसंघासाठी ५९ उमेदवार रिंगणात; विद्यापीठाकडून अंतिम यादी जाहीर

‘इलेक्शन युथ फेस्टीवल’मध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.