‘उठी उठी गोपाळा’ किंवा ‘माझे माहेर पंढरी’ असो… की ‘सुरत पियाकी छीन बिसरावे’ असो… मराठी रसिकांना सुगम संगीतही तितकेच प्रिय आणि भावगीत, अभंगही… एखादी चीज, शास्त्रीय संगीत जेव्हा सादर होते, तेव्हा रसिकांना दिवाळीची पहाट सार्थकी लागल्याचाच आनंद होतो. रविवारी सकाळी शहरातील विविध भागात रंगलेल्या दिवाळी पहाट या कार्यक्रमातून रसिकांना सुरेल मेजवानी आनंद मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नागपूर : आज लक्ष्मीपूजन, घरोघरी दिवाळीची लगबग

माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, तेजस माजी सैनिक संस्था ईवान यांच्या संयुक्त विद्यमाने आलाप संगीत विद्यालयाने सादर केलेल्या मंगल पहाट दीप स्वरांची या कार्यक्रमातून रसिकांना सुरेल मेजवानीचा आनंद दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार मोहन मते उपस्थित होते. राम भाकरे यांनी ‘उठी उठी गोपाळा’ या भुपाळीने सुरुवात केली. त्यानंतर आलापच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. अंजली निसळ यांच्या संगीत संयोजनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विशाल दहासहस्त्र, निशिकांत देशमुख, सौर किल्लेदार, मंदार मुडे, मनोज घुसे, नोमेश वलकरी यांनी सांथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन संगीता तांबोळी यांनी केले. आलापचे अध्यक्ष श्याम निसळ यांच्यासह अनेकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा- नागपूर विद्यापीठ विधिसभेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले; ३० नोव्हेंबरला निवडणूक तर २ डिसेंबर रोजी मतमोजणी

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्यावतीने स्थानिक वंजारी नगर मैदानावर आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर आणि सूर नवा ध्यास नवा ची विजेती सन्मित्रा शिंदे यांनी एकाहून एक सरस गीते सदर करुन नागपूरकर रसिकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. सूर निरागस हो या कट्यार मधील सुमधुर गीताने सुरू झालेली संगित मैफल हळूहळू रंगत गेली. अबीर गुलाल, ‘गालावर खळी..’ ही गीते यावेळी सादर करण्यात आली. मोहम्मद रफी यांच्या ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’, ‘बदन पे सितारे’ या गीतासोबत गोंधळ, भारूड, लावणी आणि देशभक्तीचा साज चढलेली ही मैफल अडीच तास चालली आणि रसिकांना आनंद देऊन गेली. दक्षिण नागपूर मतदारसंघाचे आमदार मोहन मते, सी. ए. माधव विचोरे, दक्षिण देवेंद्र दस्तुरे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. वंजारीनगर येथील मैदानावर शनिवारी रात्री सुरभी आणि सचिन ढोमणे यांच्या दीपसंध्या या कार्यक्रमासदेखील उत्तम प्रतिसाद मिळाला.

कनक सुर मंदिरतर्फे सुरेल गीतांचा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम सादर करण्यात आला. गायक डॉ. दत्ता हरकरे, कनका गडकरी, सारंग जोशी,डॉ. सचिन उंटवाले यांनी वैविध्यपूर्ण मराठी हिंदी गीते सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. भक्ती गीत, भावगीत, सिनेगीत, गरबा गीत, देशभक्तीगीत, जोगवा, लावणी अशा अनेक गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सांगता ‘ज्योत से ज्योत’ या गाण्याने झाली. श्वेता शेलगावकर यांनी निवेदन केले तर साथसंगत परीमल जोशी व सहकाऱ्यांनी केली.

हेही वाचा- राज्यातील तासिका प्राध्यापकांची दिवाळी अंधारातच ! ; मंत्र्यांच्या आदेशानंतरही कार्यवाही नाही

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडल रामनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तिरंग या कार्यक्रमात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांनी सादर केलेल्या शास्त्रीय संगीत व भक्तीगीताने रसिकांनी सुरेल मेजवांनीचा आनंद मिळाला. कलापिनी कोमकली भैरव रागातील शोभे जटा ही सुंदर शिवस्तुती सादर केली. जो नर अनहद ध्यान करे, मीराबाई के भजन सखी मोरी नींद नसानी आदी भक्तिगीते सादर केली. रामेन्द्र सिंह सोलंकी, नरेंद्र मेहुलकर, आशीष गायधनी यांनी साथसंगत केली. वृषाली देशपांडे संचालन केले.

विदर्भ गौरव प्रतिष्ठान व मल कंस्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने चिटणीस सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या तेजोमय नादब्रम्ह या संगीतमय कार्यक्रमात डॉ. साधना शिलेदार आणि अनिरुद्ध देशपांडे यांनी विविध बंदिश, गीत आणि नाट्यगीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात निलेश खोडे, संदीप गुरमुले यांनी साथसंगत केली.

हेही वाचा- विदर्भातही ‘एक्सबीबी’ उपप्रकाराचे करोनाग्रस्त; नागपूर, भंडारा, अकोल्यात नोंद

स्नेहसंवर्धक को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्यावतीने जयप्रकाश नगरातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात कार्यक्रमात प्रसन्न जोशी, ऋषिकेश करमकर, श्रेया टांकसाळ-खराबे, सायटी मास्टे, अपूर्वा माटेगावकर यांनी गीते सादर केली. या कार्यक्रमात संगीत संयोजक आनंद मास्टे तर निवेदन प्रफुल माटेगावकर केले.