नागपूर : तब्बल ४५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शहरात राज्य वरिष्ठ गट ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनने सहा वर्षांनतर नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली. येत्या जून महिन्यात शहरात ७२ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ही पूर्वचाचणी स्पर्धा ठरणार आहे. त्यामुळे नागपूरला याचे यजमानपद मिळणे महत्वपूर्ण मानले जात आहे.

वरिष्ठ गटात ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅकची आवश्यकता असते. गेल्या ५-६ वर्षांपासून नागपूरला मानकापूर येथे पहिला सिंथेटिक ट्रॅक मिळाल्यापासून असोशिएशनच्यावतीने हा प्रस्ताव दिला गेला होता. आता ही विनंती राज्य असोसिएशनने मान्य केली आहे.१९७९ मध्ये ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मातीच्या ट्रॅकवर शेवटच्या वेळी नागपूरने या स्पर्धेचे यजमानपद मिळविले होते. या चॅम्पियनशिपमधून, २७ ते ३० जून दरम्यान पंचकुला येथे होणाऱ्या ६३ व्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्यावतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूंची निवड केली जाईल. ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी पंचकुला येथील  स्पर्धा महत्वाची आहे. त्यामुळे राज्यातील खेळाडूंसाठी पंचकुला जाण्याचा रस्ता नागपूरहून जाणार आहे. याशिवाय ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान बेंगळुरू येथे नियोजित ६३ व्या राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी तसेच १५ ते १७ जून दरम्यान छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा अथलेटिक्स स्पर्धेसाठी देखील यातून खेळाडूंची निवड केली जाईल. शहरात होणाऱ्या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण ३२ ट्रॅक आणि फील्ड स्पर्धा आयोजित केल्या जातील. यात महाराष्ट्रातील सहाशेहून अधिक खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. २०१९ मध्ये नागपूरने अंडर-१८ आणि अंडर-२० राज्य स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते परंतु सिंथेटिक ट्रॅकच्या नसल्याने शहरात वरिष्ठ गटात ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नव्हते. आता ४५ वर्षांनतर शहरात ही स्पर्धा असल्याने शहरातील क्रीडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
india hyperloop track ready
मुंबई-पुणे फक्त २५ मिनिटांत; पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार, याचा भारताला फायदा कसा होणार?
ministerial post, west varhad, vidarbha
पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाची कुणाला ‘लॉटरी’?
walking pneumonia incidence increasing in mumbai
विश्लेषण : मुंबईत ‘वॉकिंग न्युमोनिया’चा प्रादुर्भाव का वाढत आहे? लक्षणे काय? उपाय कोणते?
icc agree for hybrid format for 2025 champions trophy
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसारच? २०२७ सालापर्यंतच्या सर्व स्पर्धांसाठी हाच नियम
maharashtra cabinet expansion before nagpur session
मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, ११ किंवा १२ तारखेला शक्यता
Story img Loader