अमरावती : जन्मत:च अंध असलेल्या त्या चिमुकलीला तिच्या जन्मदात्यांनी जळगाव येथील रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत टाकले. पोलिसांचे लक्ष गेल्यानंतर त्यांनी तिला ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या वझ्झर येथील आश्रमात आणले. आणि तिच्या आयुष्याला आधार मिळून जगण्याला नवी उभारी मिळाली. विषम परिस्थितीला तोंड देत जिद्दीने अभ्यास करीत तिने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले. माला हिने ही गगनभरारी घेतली आहे.
शंकरबाबा पापळकर यांच्या सहकार्याने तिने हे यश प्राप्त केले आहे. दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या इतिहासात नवीन अध्याय या निमित्ताने जोडला गेला आहे. संधी आणि साधनांचा अभाव असल्याचे कारण देत अनेकजण आपल्या नशिबाला दोष देत असतात. अशांसाठी माला या २५ वर्षीय मुलीची कथा प्रेरणादायी आहे. माला ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) लिपिक ‘गट क’ मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.
हेही वाचा >>>दर घसरले! दहा लाखाची संत्री अडीच लाखात; शेतकऱ्याने सहा एकरातील संत्रा जेसीबी…
जन्मत: अंध असल्याने आई-वडिलांनी मालाला जळगाव रेल्वे स्थानकावर कचरा पेटीत टाकून दिले होते. पोलिसांनी आई-वडिलांचा, नातेवाईकांचा शोध घेतला. परंतु शोध न लागल्याने तिला जळगाव येथील रिमांडहोम मध्ये दाखल करण्यात आले. तेथे दिव्यांगाच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समितीच्या आदेशान्वये पोलीसांनी तिला वझ्झर येथील स्व.अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले. शंकरबाबांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारुन माला हिला वडील म्हणून स्वत:चे नाव दिले. त्या आधारे तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला, इत्यादी कागदपत्राची पुर्तता करुन तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली.
हेही वाचा >>>प्रेम,नकार आणि वाघाची शिकार…; काय आहे नेमके प्रकरण ?
अनाथ, बेवारस, दिव्यांग १२५ मुला-मुलींसोबत बालगृहात मालाचा जीवनप्रवास सुरू झाला. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मालाने शिक्षणही सुरू ठेवले. येथील विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी परीक्षा २०१८ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्रा. प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि शिक्षणाची व्यवस्था केली. २०१९ पासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मालाची धडपड सुरू झाली. येथील युनिक अॅकेडमीचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनात मालाने एमपीएससी परीक्षेची तयार केली. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद आहे, पण एवढ्यावरच न थांबता केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे माला हिने सांगितले.
बेवारस स्थितीत सापडलेल्या अंध मालाने जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर यश मिळवले आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या इतिहासातील ही घटना सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा आनंद आपल्याला आहे, पण मालाच्या यशाचा अभिमान अधिक आहे. माला हिचा समाजाने यथोचित सत्कार करायला हवा. -शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक