काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांच्या सहा सभा महाराष्ट्रात होतील. यासंदर्भात १० एप्रिलला ठाण्यात प्रदेश काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहेत. यावर तिथे चर्चा करण्यात येईन. या सभा मोठ्या स्वरूपात कशा करण्यात येतील, याचे नियोजन करून केंद्रीय नेतृत्वाकडे अहवाल पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या सभांना महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतील का? आणि सभा कधी पार पडणार आहे? असे विचारले असता नाना पटोले म्हणाले, “पहिली सभा या महिन्यात होण्याची शक्यता आहे. कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात या सभांचे राज्यात आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील सहकारी पक्षांना निमंत्रण देण्यास सांगितलं, तर देण्यात येईल.”

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

हेही वाचा : “शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन”, चंद्रकांत पाटलांच्या विधानावर आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले…

ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष सत्याग्रह यात्रेत सावकरांचा फोटो लावणार असल्याचं वृत्त आहे. याबद्दल विचारले असता नाना पटोलेंनी सांगितलं, “माध्यमांती काही गोष्टी चुकीच्या आल्या आहेत. ठाण्याच्या अध्यक्षांना याबाबत विचारले असता, त्यांनी असं काही केलं नसल्याचं म्हटलं. काही माध्यमांनी मूळ मुद्द्याला बाजूला करण्यासाठी भाजपाची सुपारी घेतल्याचं वाटते.”

हेही वाचा : “देश धर्मानुसार चालला तर आपला पाकिस्तान होईल, कारण…”, संजय राऊतांचं मोठं विधान

“कारण, अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडला आहे. शेतकऱ्यांची काळजी राज्य आणि केंद्र सरकारला नाही आहे. तूर, दाळ, द्राक्ष, कांदा शेतकऱ्यांचे वाटोळे सुरू असून आत्महत्या होत आहेत. अशी एखादी कोणतीतरी गोष्ट घेऊन, त्याला माध्यमांवर प्रसिद्धी दिली जाते. पण, आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे. आमचे हिंदुत्व कुणा येऱ्या गबाळ्याचे नाही. ही भूमिका आम्ही सातत्याने मांडली आहे,” असे नाना पटोलेंनी म्हटले.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्या हिंदुत्वाचे समर्थन आम्ही करत आहोत. आम्ही दुसऱ्यांचे समर्थन करत नाहीत,” असे नाना पटोलेंनी सांगितलं.

Story img Loader