लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानी आणि बिबट यांचा म्हटला तर संबंध आहे आणि म्हटला तर नाही, पण गेल्या काही वर्षात यांचे समीकरण मात्र घट्ट होऊ लागले आहे. बिबट्यांचा अधिवास शहरांबाहेर असला तरीही अधूनमधून शहरात त्यांचा फेरफटका सुरूच आहे. जंगल आणि गावाच्या सीमेवर असणारा हा प्राणी आता गाव, शहरात देखील तेवढ्याच अधिकाराने घुसखोरी करत आहे. काही दिवसांपूर्वी कोराडी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात बिबट्याच्या जोडीचे वास्तव्य आढळून आल्याने पुन्हा एकदा नागपूरकर आणि बिबट्याच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. वन्यजीवप्रेमी दर्शन घटामे यांनी या परिसरात बिबट्याचा हा व्हिडिओ चित्रित केला आहे.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला

नागपूर शहराच्या सभोवताल गोरेवाडा, अंबाझरी, हिंगणा येथे मोठ्या प्रमाणात जंगल असून वन्यप्राण्यांची संख्याही आहे. त्यातही गोरेवाडा येथे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर अंबाझरीतही बिबट आहे. गोरेवा्डयातील बिबट कित्येकदा वाडी, दाभा परिसरात आलेले नागरिकांनी पाहिले आहे. त्यांना जेरबंद करण्याआधीच ते जंगलात परत गेले आहेत.

आणखी वाचा-गडचिरोली : भोंगळ कारभार! पहिलाच पाऊस अन एक हजार कोटींचे रस्ते उखडले…

मात्र, तीन वर्षांपूर्वी चक्क आठ दिवस नागपूर शहरात बिबट्याने मुक्काम ठोकला. अंबाझरी जैवविविधता उद्यानातून आलेला हा बिबट अखेरपर्यंत वनखात्याच्या हाती लागला नाही. मे २०२१ मध्ये आयटी पार्क परिसरातील गायत्री नगरात एका नागरिकाच्या स्नानगृहात बिबट्याने ठाण मांडले. भर शहरात बिबट आढळल्याने नागपूरात खळबळ उडाली. वनखात्याला दूरध्वनीवरुन माहिती देण्यात आली, पण खात्याची चमू पोहोचेपर्यंत बिबट्याने आपले बस्तान हलवले होते.

आणखी वाचा-नागपूर : पुतण्याची काकावर टीका, म्हणाले “अनिल देशमुख सुरुवातीपासून फॅशनेबल नेते, ‘तो’ पेन ड्राइव्ह करप्ट…”

या संपूर्ण परिसरात त्याचा शोध घेण्यात आला. एका आयटी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचे छायाचित्र आल्याने बिबट त्याच परिसरात फिरत असण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास परिसरातीलच एका सॉफ्टवेअर कंपनीच्या वॉल कम्पाउंडवरुन चालताना सुरक्षा रक्षकाला दिसला. गायत्रीनगर परिसरातून सुरू झालेला बिबट्याचा प्रवास राष्ट्रीय उर्जा प्रशिक्षण संस्था, परसोडी, आयटीपार्क, व्हीएनआयटी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विश्रामगृह परिसर ते थेट महाराजबाग प्राणीसंग्रहालयापर्यंत झाला. मात्र, बिबट्या वनखात्याच्या हातात काही गवसला नाही. त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यात बकरी अडकवण्यापासून तर कितीतरी आमिषे त्याला दाखवण्यात आली. तरीही तो जसा आला, तसाच निघून गेला.

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र परिसरात बिबटच नाही तर वाघांचेही वास्तव्य आहे, पण आता नागपूरातील कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात एकच नाही तर दोन बिबट आढळून आले आहेत. बिबट्याचा हा व्हिडिओ वन्यजीवप्रेमी दर्शन घटामे यांनी चित्रीत केला आहे.