नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटात कोणकोण आहेत याचा हिशेब सुरू असताना भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य पकंज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.पंकज ठाकरे विद्यार्थी चळवळीतून पुढे आले आहेत. ते नऊ वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेले होते. त्यापूर्वी त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्यप्रमुख पद भूषवले होते. भाजपने त्यांना प्रदेश निमंत्रित सदस्य केले होते.

पक्षावरील संकट काळात ऋणानुबंधांची परतफेड करता यावी, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटात त्यांनी आज पक्षप्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल देशमुख, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, शेखर सावरबांधे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला.