लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : आपण नोकरीच्या शोधात आहात..? तर तुमच्यासाठी चालून आली आहे मोठी संधी. सुशिक्षित, बेरोजगार उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कौशल्य विकास व रोजगार केंद्रातर्फे अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांतील १७० पदे भरली जाण्यासोबतच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ९२ पदांसाठी इंटर्नशीपची संधीही मिळणार आहे.

टारगेट सेक्युरिटी कंपनीत सुरक्षा कर्मचाऱ्यांची १५ (शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण, वयोमर्यादा २१ ते ४५ वर्ष), भारतीय जीवन विमा निगममध्ये विमा सखींची ३० (वयोगट २५ ते ६५, पात्रता १२ वी), पिपल ट्री ऑनलाईनमध्ये केअरटेकरची २० पदे (वय २१ ते २९, पात्रता एनएनएम, जीएनएम), तसेच मशिन ऑपरेटरची २० पदे (वय १८ ते ३०, किमान १२ उत्तीर्ण) भरली जातील. छ. संभाजीनगर येथील नवभारत फर्टिलायझर्समध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांची ३५ पदे (वयोमर्यादा १८ ते २८, दहावी, बारावी किंवा पदवीधर), तसेच कृषी अधिकाऱ्यांची १५ पदे (वय २१ ते २१ ते ३५, कृषी पदविका किंवा पदवी) भरली जातील. ब्ल्यू डार्ट कुरिअर सर्व्हिसमध्ये डिलिव्हरी बॉयची १० पदे (वय १८ ते ३०, किमान १२ वी), तर बॅक ऑफिस मदतनीस (वय १८ ते ३०, पदवी, संगणक ज्ञान) अशी २० पदे भरली जातील. पुण्याच्या जॉन डिरे कंपनीत प्रशिक्षणार्थ्यांची २० पदे (वयोमर्यादा १८ ते २४, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स यापैकी कुठलीही पदविका) भरली जाणार आहेत. औद्योगिक वसाहतीत अप्पू पुतळा परिसरातील अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात हा मेळावा सकाळी ११ ते दु. २ या वेळेत होईल. 

संकेस्थळावर करावी लागेल नोंदणी

मेळाव्यात www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन लॉगइन आय डी व पासवर्डचा वापर करुन सहभाग नोंदवता येईल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत १८ ते ३५ वयोगटातील ९२ उमेदवारांना (एएमएम, जीएमएम, बारावी, पदविका, आयटीआय, पदवीधर अशा विविध अर्हता) ओझोन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आयकॉन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, वॉसटॉक इंडस्ट्रीज, गुजराज अंबुजा एक्स्पोर्ट लि.,  साईराज कृषी इंडस्ट्रीज, प्राजक्ता कृषी मशिनरी, गोदावरी लाईफ सायन्स आदी कंपन्यांत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. महास्वयम संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या इंटर्न लॉगिनमधून सहभाग नोंदवता येईल. इच्छूकांना २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा व छायाचित्रांसह उपस्थित राहावे लागणार आहे.