वर्धा : पक्षाच्या विशेष उपक्रमासाठी वर्धा दौऱ्यावर असलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी येथील आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली.
अंबिका चौकात सांगता प्रसंगी बावनकुळे म्हणाले की, राज्यात उत्तम काम करणाऱ्या पहिल्या २५ आमदारांत भोयर यांचा क्रमांक आहे. त्यांना विकासाची दृष्टी आहे, अशी पावती त्यांनी सर्वांसमक्ष दिली. या प्रसंगी काहींचा पक्षप्रवेश झाला. खासदार रामदास तडस, संघटन सचिव उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, अविनाश देव, राजेश बकाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा – बुलढाणा : अनन्वित छळ! पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, पतीला…
हेही वाचा – खासगी बसेसमध्ये आता विमानाप्रमाणे प्रवाशांना सूचना!
निवडणुकीच्या पार्श्भूमीवर पुढील १३ महिने रोज तीन तास पक्षीय कार्यासाठी देण्याचे आवाहन बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. बजाज सार्वजनिक वाचनालयात त्यांनी संघटनात्मक बैठक घेतली. विजयाचा कानमंत्र दिला.