लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये गुरुवारी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तीन हजार किलोची खिचडी तयार केली आहे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपुरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु आहे. या खासदार महोत्सवात विविध कार्यक्रम होत असताना गुरुवारी विजय गजानन स्तोत्राचे पठण केले जात आहे. पठण करणाऱ्या भाविकांना या प्रसादाचे वितरण केले जाणार आहे. पहाटेपासूनच या खिचडीच्या प्रक्रियेला सुरुवात झालीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या खिचडी प्रसादाचा वाटपाला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे.
आणखी वाचा-राज्यात गाय-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के
या खिचडीसाठी तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंबिर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी या साहित्याचा वापर केला. त्यासाठी १० फूट व्यासाची, ५ फूट ऊचीची कढईचा उपयोग करण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार गजानन महाराजांचे भक्त या महाप्रसादाचा लाभ घेणार आहे.