बुलढाणा: परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे आज सोमवारी, १६ डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. परभणी येथील घटनेचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मलकापूर पांगरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे गावातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले.

हेही वाचा – “हव्या त्या विषयावर चर्चेसाठी तयार, विरोधकांनी उगाच राजकारण करू नये…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

सर्व जाती धर्माच्या लहान मोठ्या दुकानदार, व्यावसायिक, किरकोळ विक्रेते यांनी बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापली दुकाने बंद ठेवली. यावेळी बसस्थानक परिसरात असलेली सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आली.

हेही वाचा – “आता मंत्रीपद दिले तरी घेणार नाही,” विजय शिवतारेंची उद्विग्न प्रतिक्रिया

बंद यशस्वी करण्यासाठी मलकापूर पांगरा ग्रामपंचायतचे सदस्य राजू साळवे, कैलास साळवे, दिलीप काकडे, बाळू पवार, रामेश्वर सोनकांबळे, गजानन चरवे, किशोर साळवे, अक्षय मगर, आदींनी पुढाकार घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parbhani incident reaction in buldhana district malkapur pangra shutdown scm 61 ssb