नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला पारडी उड्डाणपूल अखेर गुरुवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पारडी उड्डाणपुलाचा सेंट्रल ॲव्हेन्यू रोडवरील मार्गिका वाहतुकीसाठी गुरुवारी खुला करण्यात आला आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या उड्डाण पुलाचे लोकार्पण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पारडी उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. भूमिपूजनाला सुमारे साडेनऊ वर्षे झाले. बांधकाम सुरू होऊन साडेसात वर्षे पूर्ण झाले. पारडी उड्डाणपुलाची पूर्ण करण्याची अंतिम मुदत एनएचएआयने वारंवार पुढे ढकलली होती.

या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका २०२३ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु एचबी टाऊन, सेंट्रल ॲव्हेन्यूकडील मार्गिका आणि अंतर्गंत रिंग रोडकडील मार्गिकेचे काम अपूर्ण होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू होते. अखेर ते काम पूर्ण झाले आणि आज ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्यात स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. आज उड्डाणपुलाची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्ण आणखी काही दिवस घेण्यात येईल. त्यानंतर अधिकृतपण वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पूर्व नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूरला जोडण्यासाठी व या भागात होणारी वाहन कोंडी लक्षात घेता पाच नवे उड्डाण पूल बांधण्यात येणार असून त्यासाठी ७९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

पूर्व , मध्य नागपूरला दक्षिण नागपूरशी जोडणाऱ्या रस्त्यांवर होणारी वाहनकोंडी व त्यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता तेथे उड्डाण पुल बांधण्याची मागणी या भागातील आमदारांनी केली होती.

महारेल’ कंपनीने याबाबत प्रस्ताव तयार केले होते. प्रस्तावित उड्डाण पुलांमध्ये रेशीमबाग ते के.डी.के. कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट (२५१ कोटी), चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौक (६६कोटी), लकडगंज पोलीस ठाणे ते वर्धमाननगर (१३५ कोटी), नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक (६६ कोटी) आणि वर्धमाननगर ते निर्मलनगरी उमरेड रोड (२७४कोटी) आदींचा समावेश आहे. यासाठी लागणाऱ्या एकूण ७९२ कोटी रुपयांस शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १९ ऑक्टोबरला नगरविकास विभागाने काढला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pardi flyover in nitin gadkari constituency opens after nine and a half years rbt 74 zws