लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.

नितीन गडकरी यांच्या प्रचारात शाळकरी मुलांचा वापर करून करून आदर्श आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे ३ एप्रिल २०२४ केली होती. तसेच गडकरींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.

आणखी वाचा- नागपूर लोकसभा : मतदान करणाऱ्यांच्या संख्येत अल्प वाढ, संकेत काय?

या तक्रारीनुसार, निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरी देखील गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला. १ एप्रिल २०२४ रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी करण्यात आले. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन आहे, याकडे लक्ष वेधत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी ,अशीमागणी लोंढे यांनी केली होती.

आणखी वाचा-फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”

या प्रकरणी एनव्हीएम फुलवारी शाळा, वैशालीनगर, नागपूर या शाळेचे संचालक व मुख्याधापिका यांना सुनावणी सुनावणीसाठी बोलावण्यात आले. सुनावनीअंती व त्यांनी सादर केलेल्या लेखी खुलाशानुसार या प्रकरणी शाळा संचालक मुरलीधर पवनीकर हे दोषी आढळून आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांच्या स्वागताकरिता शालेय विद्यार्थ्यांचा अनावश्यपणे वापर केल्याचे दिसून आले. त्यामुळे शाळेचे संचालकावर नियमानुसार कार्यवारही करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (माध्यामिक) यांना देण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Participation of school children in nitin gadkaris campaign election commission orders of action rbt 74 mrj
First published on: 23-04-2024 at 17:14 IST