वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सर्वच पक्ष निर्णयाक टप्प्यात आले आहे. आता कोणती जागा कोणाला व जागेवर उमेदवार कोण, यावर चर्चा झडत आहे. वर्धा मतदारसंघाचे तसेच. हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार अशी आशा नेते लावून बसले असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुढग्यास बाशिंग बांधून बसले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख,माजी आमदार राजू तिमांडे, सहकार नेते समीर देशमुख, कराळे गुरुजी यांचीच संभाव्य उमेदवार म्हणून नावे पुढे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी हे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटून आले. वाट बघा असा सल्ला मिळाला. हर्षवर्धन देशमुख यांनी अनुत्सुकता दाखवत आदेश आल्यास लढणार असल्याचा पवित्रा घेतला. कराळे गुरुजी सोबत असलेले प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले म्हणाले की आज सायंकाळी बोलणे होणार आहे. तसे आम्हास सांगण्यात आले. पैश्याची जबाबदारी उमेदवारावरच राहणार, असे ते म्हणाले. यापूर्वी समीर यांचे शिष्टमंडळ पवारांना भेटले होते. टेवजा पण पक्ष पैसे देणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा..“आमदार सुभाष धोटेंचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने,” देवराव भोंगळे यांचा पलटवार; म्हणाले….

यापैकी हर्षवर्धन यांनीच खर्च करू शकणार नाही, असे सांगून बचावचा उघड पवित्रा घेतला होता.
जिल्ह्यातील तीन तर अमरावतीचा एक असे चार ईच्छुक उमेदवारी साठी चर्चेत आहे. त्यामुळे भाजपच्या पैलवानास या पैकी खरच कोण लढत देऊ शकेल, याची गमतीने चर्चा होते. कारण या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस किती मजबूत आहे याचे स्पष्ट चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेस ईच्छुक आहेच. सेना ठाकरे गट सध्या चर्चेत पण नाही. त्यामुळे महाआघाडीचा उमेदवार सर्वमान्य असा येणार की तेली कुणबी वादाची झालर त्यास असणार, याचे तर्क बांधल्या जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party will not give fund for contest election soon tell to members about ticket sharad pawar said chandrapur local national congress leaders pmd 64 psg