अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या पॅसेंजर व मेमू विशेष गाड्या आता नियमित क्रमांकासह चालवल्या जात आहेत. या बदलाची अंमलबजावणी आज, १ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. मध्य रेल्वे मार्गावरील पॅसेंजर व मेमू रेल्वे गाड्यांना आजपासून नियमित क्रमांक प्राप्त झाले. पूर्वी चार अंकी असलेला क्रमांक आता पाच अंकी झाला. गाडी क्रमांक ०१३६५ भुसावळ-बडनेरा विशेष गाडी आता नियमित गाडी क्रमांक ६११०१ मेमू ट्रेन म्हणून धावेल. गाडी क्रमांक ०१३६६ बडनेरा-भुसावळ विशेष गाडी आता नियमित गाडी क्रमांक ६११०२ मेमू म्हणून धावेल. गाडी क्रमांक ०१३६७ बडनेरा-नरखेड आता नियमित क्रमांक ६११०३ मेमू गाडी म्हणून धावणार आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर – नागपूर मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार
गाडी क्रमांक ०१३६८ नरखेड-बडनेरा विशेष गाडी आता नियमित क्रमांक ६११०४ मेमू म्हणून, गाडी क्रमांक ०१३६९ बडनेरा-नरखेड विशेष गाडी आता नियमित मेमू क्रमांक ६११०५, गाडी क्रमांक ०१३७० नरखेड- बडनेरा विशेष गाडी आता नियमित मेमू क्रमांक ६११०६, गाडी क्रमांक ०१३७१ अमरावती-वर्धा विशेष गाडी आता नियमित मेमू क्रमांक ६११०७, गाडी क्रमांक ०१३७२ वर्धा-अमरावती विशेष गाडी आता नियमित मेमू क्रमांक ६११०८, गाडी क्रमांक ०१३७५ बडनेरा- अमरावती विशेष गाडी आता नियमित मेमू क्रमांक ६११११, गाडी क्रमांक ०१३७६ अमरावती – बडनेरा विशेष गाडी आता नियमित मेमू क्रमांक ६१११२ मेमू, गाडी क्रमांक ०१३७७ बडनेरा-अमरावती विशेष गाडी नियमित मेमू क्रमांक ६१११३, गाडी क्रमांक ०१३७८ अमरावती-बडनेरा विशेष गाडी नियमित मेमू क्रमांक ६१११४, गाडी क्रमांक ०१३७९ बडनेरा-अमरावती विशेष गाडी आता नियमित मेमू क्रमांक ६१११५, गाडी क्रमांक ०१३८० अमरावती-बडनेरा विशेष गाडी आता नियमित क्रमांक ६१११६ 61116 मेमू म्हणून धावणार आहे.
हेही वाचा >>> सायबर सुरक्षेसाठी आता ‘यूजीसी’चे अभियान, महाविद्यालयांना…
बडनेरा-नाशिक विशेष रेल्वे गाडीला मुदतवाढ रेल्वे गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होत आहे. हे लक्षात घेता बडनेरा ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. गाडी क्र.०१२११ बडनेरा ते नाशिक रोड दररोज अनारक्षित विशेष ३१ मार्चपर्यंत चालविण्यात येईल. गाडी क्र.०१२१२ नाशिक रोड ते बडनेरा दररोज अनारक्षित विशेष ३१ मार्चपर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.