नागपूर: प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने मस्कतहून बँकॉकला जात असलेल्या ओमान एअरलाईन्सच्या विमानाचे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास नागपूर विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. ओमान एअरलाईन्सचे विमान २ नोव्हेंबरला मस्कतहून बँकॉकला जात होते, यादरम्यान विमानातील एक प्रवाशाची प्रकृती बिघडली. वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याने वैमानिकाने तातडीने विमान नागपूरकडे वळवले. लगेच नागपूर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली आणि दुपारी अडीचच्या सुमारास विमान सुरक्षितपणे नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. तोपर्यंत विमानतळावर रुग्णवाहिकेसह तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार ठेवण्यात आले होते. विमान उतरताच आजारी पडलेल्या प्रवाशाला तत्काळ एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर विमान नागपुराहून उडाले नव्हते. तसेच आजरी प्रवाशाच्या स्थितीबद्दल कळू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा