२४ डिसेंबरपासून विदेशातून भारतात येणाऱ्या २ टक्के प्रवाशांची करोना तपासणीची सक्ती करण्यात आली आहे. यावरील अंमलबजावणीपूर्वी नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने २३ डिसेंबरच्या मध्यरात्री दोहावरून आलेल्या विदेशी प्रवाशांचे नमुने घेतले. यावेळी एक प्रवासी वगळता इतरांनी विरोध केल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
हेही वाचा- राज्यात करोनाची सक्रिय रुग्णसंख्या कमी; ९८ टक्के रुग्ण ठणठणीत
उपराजधानीत आठवड्यात दोहा आणि शारजहा येथून सुमारे १२ आंतरराष्ट्रीय विमाने येतात. बुधवारी एकही विमान येत नाही. दरम्यान, सरकारने विदेशातून येणाऱ्या विमानातील लक्षणे असलेल्या प्रत्येक प्रवाशांसह लक्षणे नसलेल्या किमान २ टक्के प्रवाशांची करोना चाचणीची सक्ती केली आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीपूर्वी नागपूर महापालिकेच्या आरोग्य पक्षताने २३ डिसेंबरच्या मध्यरात्री दोहाहून शंभरावर प्रवासी घेऊन आलेल्या विमानातील प्रवाशांचे नमुने घेण्यासाठी विमानतळ गाठले. परंतु एक प्रवासी वगळता इतरांनी २४ डिसेंबरनंतरच्या आदेशावर बोट ठेवत नमुने देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतरही महापालिकेकडून एकूण प्रवाशांपैकी नागपुरातील प्रत्येक व्यक्तीची यादी मोबाईल क्रमांकासह संबंधित झोनच्या पथकाला पाठवली जाणार आहे.
हेही वाचा- देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव
सबंधित झोनकडून त्यातील कुणात लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने चाचणी केली जाणार आहे. प्रात्याक्षिक चाचणीत महापालिकेला कटू अनुभव आला असला तरी २४ डिसेंबरला मध्यरात्री शारजहा आणि दोहा येथून दोन आंतरराष्ट्रीय विमाने नागपूरला येतील. त्यातील प्रवासी चाचणीला सहकार्य करणार काय, याकडे लक्ष लागले आहे.