नागपूर: नागपूरसह पूर्व विदर्भात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. भंडारा, गोंदियात, गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या जिल्ह्यात इतर ठिकाणावरून आलेल्या एसटी प्रवाशांनाही फटका बसला.विविध आगारातून एसटी बसने गडचिरोली अथवा इतर जिल्ह्यात निघालेले शेकडो प्रवासी रोज वेगवेगळ्या भागात पुरामुळे अडकून पडत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) माहितीनुसार शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सकाळी ८ वाजता दरम्यान पूर्व विदर्भातील अनेक नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या भागात प्रवाशाना घेऊन जाणा-या एसटी बस तेथे अडकून पडली. पुरामुळे एसटीच्या फेऱ्या प्रभावित झालेल्या भागात गडचिरोली- आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी वरील पाल नदी, गाढवी नदी, कोलांडी नाल्याला पूर होता. तेव्हा येथील एसटीची प्रवासी वाहतूक प्रभावित झाली.

beggars Nagpur, beggars luxury bus,
नागपुरात भिकारी गोळा केले… आलिशान गाडीत बसवले आणि थेट…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
police Nagpur dance, police dance suspended nagpur,
VIDEO : ‘खैके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स अन् निलंबनाची कुऱ्हाड; नागपुरातील ते चार पोलीस…
African Giant Snail which is causing havoc all over the world was found in Brahmapuri
जगभरात तांडव माजवणारी ‘ती’ ब्रम्हपुरीत आढळली…
police chase diesel thieves and recovered stolen diesel stock
‘समृद्धी’वरील उत्तररात्रीचा थरार…काय घडले?
Petition in court against Nitin Gadkaris ministry about loss of one lakh crores to the country
नितीन गडकरींच्या मंत्रालयामुळे देशाला एक लाख कोटींचा तोटा? न्यायालयात याचिका… काय आहे कारण?

हे ही वाचा…

गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी वरील शिवनी नदी, ब्रह्मपुरी- वडसा राष्ट्रीय महामार्गावरील भुती नाला, अहेरी- देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्गावरील वट्रा नाला (ता. अहेरी), आरमोरी रामाळा रस्ता (गाढवी नदी) ता. आरमोरी, आरमोरी- जोगिसाखरा रस्तावरील गाढवी नदी (ता. आरमोरी), भेंडाळा- गणपुर बोरी रस्तावरील हळदीमाल नाला (ता. चामोर्शी), शंकरपूर- हेटी मार्कंडादेव फराळा घारगाव दोडकुली रस्तावरील मार्कंडादेव जवळील नाला (ता. चामोर्शी), भेंडाळा- हरणघाट रस्ता राज्यमार्गावरील दोडकुली नाला (ता. चामोर्शी), अरसोडा- कोंढाळा कुरूड वडसा रस्ता ता. देसाईगंज, खरपूंडी- दिभना रस्ता ता. गडचिरोली आणि आमगाव सावंगी वळणमार्गावर नदी- नाल्यांना पुर होता. त्यामुळे या भागातील एसटीची प्रवासी वाहतूक बंद पडली होती.

दरम्यान या वा जवळच्या आगारातून एसटीने निघालेले प्रवासी या पुरांमुळे अडकून पडले. बराच वेळ लोटल्यावरही पाणी कमी होऊन वाहतूक सुरू होत नसल्याने त्यापैकी काहींनी परतीचा मार्ग धरला. तर काही प्रवाशाना घेऊन एसटी बस लांबच्या मार्गाने गंतव्य ठिकाणी पोहचली, असे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे तीन ते चार तास विलंब झाला. दुसरीकडे पुरामुळे एसटीची वाहतूक प्रभावित झाल्याने महामंडळाला लक्षावधीं रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

हे ही वाचा…

गुरूवारी या भागातही फटका

भंडारा जिल्ह्यातील भंडारा-तुमसर मार्गावरील टाकळीजवळ गुरूवारी पुराचे पाणी तुंबले. गोंदिया-धापेवाडा मार्ग, लाखांदूर-पवनी मार्गावरील खैरी जवळ, तुमसर-बपेरा मार्ग, दिघोरी-पालांदूर मार्ग, दिघोरी पालांदूर मार्ग, साकोली-चंद्रपूर मार्ग आरमोरी जवळ, साकोली-ककोडी मार्ग, देवरी-मगरडोह मार्ग पालांदूर जवळ, केशोरी-निलज मार्ग मिलजजवळ पुराच्या पाण्यामुळे एसटीच्या फेऱ्या काही काळ बंद होत्या. पुराच्या पाण्यामुळे भंडारा-तुमसर मार्ग बंद असल्याने सर्व एसटी बसेस रामटेक मार्गे वळवून चालवल्या जात होत्या.