अकोला : उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. आग्रा विभागातील मथुरा स्थानकावर ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम सुरू आहे. यासाठी पलवल-मथुरा दरम्यान ‘नॉन इंटरलॉकिंग’ कामासाठी काही मेल, एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येत आहेत. यात अकोला मार्गे धावणाऱ्या दोन रेल्वेचा समावेश आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचे सरकार आजही आहे, उद्याही राहणार”
हेही वाचा – “गुन्हेगारांच्या स्थानबद्धतेत होणारा विलंब समाजासाठी धोकादायक,” उच्च न्यायालय म्हणाले…
जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेसच्या दोन, तर गोंडवाना एक्सप्रेसच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्र. १२७५१ नांदेड – जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस २६ जानेवारी आणि ०२ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली. १२७५२ जम्मू तावी नांदेड हमसफर एक्स्प्रेस २८ जानेवारी आणि ०४ फेब्रुवारी रोजी रद्द केली. गाडी क्र. १२४०५ भुसावळ – हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस २८, ३० जानेवारी, ०४ व ०६ फेब्रुवारी रोजी रद्द केली. गाडी क्र. १२४०६ हजरत निजामुद्दीन – भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस २६, २८ जानेवारी, ०२ व ०४ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. दिल्लीसह उत्तर भारताकडे जाणाऱ्या या गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे.