गोदिया: सध्या गोंदिया जिल्ह्यात तापमान सातत्याने वाढत असल्याने रेल्वे स्थानक कडाक्याच्या उन्हात होरपळत आहे. येथील प्रवासी दररोज घामाने भिजत आहेत. येथे प्रवाशांना उष्ण हवे पासून दिलासा देण्यासाठी रेल्वेने काही वर्षांपूर्वी स्थानकात मिस्टिंग शॉवर यंत्रणा बसवली होती. यामुळे थंड पाण्याच्या शॉवरमुळे कडक उन्हा पासून बराचसा दिलासा मिळत होता, मात्र जिल्ह्यात उकाडा वाढून ही यंत्रणा अजूनही बंदच आहे.
एप्रिल महिन्याला १० दिवस उलटूनही ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे स्थानकाच्या सर्व फलाटांवर प्रवाशांची रोजच उकाड्यामुळे हाल होत आहे. विशेष म्हणजे उष्णते पासून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी प्लॅटफॉर्मवर मिस्टिंग पद्धतीने पाण्याचे फवारे सोडले जातात.अगदी उन्हाळा संपे पर्यंत ही सुविधा सुरू असते. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ मध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र शॉवर सुरू झालेला नाही
सध्या गोंदियाचे कमाल तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. कडाक्याच्या उन्हात फलाटावर उभे राहून ट्रेन ची वाट पाहणाऱ्या हजारो प्रवाशांना उकाळ्याच्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
” गोंदिया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मिस्टिंग शॉवर सिस्टीम बसवण्यात आली आहे.पण सध्या मिस्टिंग शॉवर यंत्रणा बंद आहे. ते का बंद आहे. या बद्दल सध्या माझ्याकडे माहिती नाही , स्थानकावरील तांत्रिक विभागाकडून ही माहिती घेतल्यानंतर या संदर्भात मला काही सांगता येईल..” – मृत्युंजय रॉय, स्टेशन व्यवस्थापक, गोंदिया.