लोकसत्ता टीम

गोंदिया : हावडा-मुंबई मार्गावर रेल्वे विभागांतर्गत राजनांदगाव ते कळमना दरम्यान तिसरा लोहमार्गाला आमगाव रेल्वे स्थानकाला जोडयासाठी ३५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असताना आता याच मार्गावर इलेक्ट्रानिक इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे; तर दुसरीकडे दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपुर खंड अंतर्गत राउरकेला स्टेशनचे यार्ड व आधुनिकीकरणासह तिसऱ्या रेल्वे लाईनला जोडण्याचे कार्य सुरु असल्यामुळे पुन्हा काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत असल्याचे शनिवारी रेल्वे प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेची रद्द मोहिम कायम असल्याचे दिसून येत आहे. यात मात्र,सणासुदीच्या काळात प्रवाशांचे बेहाल होत आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’

मागील काही महिन्यांपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक अमुक तमुक कारणांनी बिघडले आहेच. त्यातच आता तिसऱ्या लाईनसाठी अनेक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखीनच भर पडली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हावडा-मुंबई मार्गावरील मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर अशा ३५ गाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असताना, आता पुन्हा काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे, दुर्ग-गोंदिया मेमू पॅसेंजर ११ते १३ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली.

आणखी वाचा-नांदेड रुग्णालय मृत्युसत्रानंतर प्रशासन सतर्क, यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह स्त्री रुग्णालयात…

तर गोंदिया-दुर्ग मेमू १२ते १४ ऑक्टोबर, इतरवारी- रामटेक मेमू १० ते १३ ऑक्टोबर, रायपूर-डोंगरगड, गोंदिया – रायपूर मेमू १० ते १३ ऑक्टोबर, रायपूर, गोंदिया- डोंगरगड मेमू ११ ते १४ ऑक्टोबर, बिलासपूर-रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेस १२ ते १४ ऑक्टोबर, भुनेश्वर कुर्ला एक्स्प्रेस ९ ते १४ऑक्टोबर, सिकंदराबाद – रायपूर एक्स्प्रेस ११ ते १३ ऑक्टोबर, रायपूर-सिकंदराबाद १२ ते १४ ऑक्टोबर, बिलासपूर-पुणे व पुणे-बिलासपूर १२ व १३ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आल्या आहे. त्यात शुक्रवारी आणखी भर पडली असून या मार्गावरील १२८८० भूनेश्वर-कुर्ला एक्सप्रेस, १२८७८ कुर्ला- भूनेश्वर एक्सप्रेस, २०८१३ पूरी-जोधपुर एक्सप्रेस, २०८१४ जोधपुर-पूरी एक्सप्रेस हे पण १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द राहणार आहेत.

या रेल्वेगाड्याही रद्द

चक्रधरपुर खंड अंतर्गत राउरकेला स्टेशनचे यार्ड व आधुनिकीकणासह तिसऱ्या रेल्वे लाईनला जोडण्याचे कार्य सुरु असल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाडी क्रमांक ०३२५३ पटना- सिकंदराबाद स्पेशल, ०७२५५ हैदराबाद- पटना स्पेशल, ०७२५६ सिकंदराबाद – पटना, ०७०५२ रक्सौल-हैदराबाद स्पेशल ०७०५१ हैदराबाद-दरभंगा स्पेशल या रेल्वेगाड्याही १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Story img Loader