नागपूर: उपराजधानीमधील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ परिसरात असलेले पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क येत्या ९ मार्चपासून उत्पादनासाठी सज्ज होणार आहे. या मेगा फूड पार्कची पायाभरणी सप्टेंबर २०१६ मध्ये झाली होती. आता हे पार्क फळे आणि भाजीपाला प्रक्रियेचे एक प्रमुख केंद्र बनणार आहे. हे फूड पार्क विशेषतः संत्री, गोड लिंबू, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांच्या प्रक्रियेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये, दररोज ८०० टन फळांवर प्रक्रिया करून रस, रस सांद्रता, लगदा, पेस्ट आणि प्युरी तयार केली जाणार आहे. यासोबतच आंबा, पेरू, पपई, डाळिंब, स्ट्रॉबेरी, सफरचंद, नाशपाती, टोमॅटो आणि गाजर यांसारख्या उष्णकटिबंधीय फळांवरही प्रक्रिया केली जाईल. आतापर्यंत यामध्ये १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या फूड आणि हर्बल पार्क बद्दल अधिक माहिती देताना पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, स्थानिक महाराष्ट्रातील लोकांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही या ठिकाणी स्थानिक तरुणांना फूड प्रोसेसिंग बद्दल कौशल्य देण्यासाठी ट्रेनिंग ही चालवण्याचा विचार असल्याचे आम्ही या ठिकाणी जेवढा संत्रा शेतकऱ्यांकडून आणला जाईल तो सर्व घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या फूड पार्कमध्ये रोज ८०० टन संत्रा लागणारच आहे. शिवाय त्यापेक्षा जास्त संत्रा प्रतिदिन आला तरी त्याचा वापर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. नागपुरातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा