नागपूर : अफ्रिकन देशातील एका ६८ वर्षीय रुग्णावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपणातून (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) जीवनदान मिळाले आहे. या रुग्णाला यापूर्वी मुखाचा कर्करोग झाला होता. यशस्वी उपचारातून तो बरा झाला होता. रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर त्याने भारतीय डॉक्टरांची प्रशंसा करत त्यांचे आभार मानले. डेविड (बदललेले नाव) असे रुग्णाचे नाव आहे. तो अफ्रिकेतील बोत्सवानामध्ये राहतो. २००७ मध्ये त्याला तोंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नागपूर : ‘अंनिस’च्या माध्यमातून भोंदू बाबांचा भांडाफोड करण्याचा संकल्प : डॉ. हमीद दाभोळकर

त्यावेळी त्यावर तेथील रुग्णालयात शल्यक्रियासह रेडिओथेरपी व किमोथेरपीतून उपचार झाले. या आजारातून बाहेर आल्यावर वयाच्या ६८ व्या वर्षी त्याला ‘मल्टिपल मायलोमा’चे निदान झाले. या आजारातून वाचण्यासाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची गरज होती. त्याला नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयाची माहिती मिळाली. त्याने येथे संपर्क साधला. येथे डॉ. गुंजन लोणे, डॉ. विश्वदीप खुशू यांच्यासह संपूर्ण चमूने त्याच्यावर यशस्वी प्रत्यारोपण केले.