नागपूर: राज्य सरकार सतत सरकारी रुग्णालयांना खूप निधी दिल्याचे सांगते. मात्र, गेल्या तीन वर्षांची नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) स्थिती बघता येथे प्रत्येक वर्षी रुग्ण वाढले. परंतु औषधांच्या खर्चाला मात्र कात्री लागली आहे.

मेयो रुग्णालयात २०२१ मध्ये बाह्यरुग्ण विभागात ३ लाख ७८ हजार ७०७ रुग्णांवर उपचार झाले. त्यापैकी ३० हजार ९८८ रुग्णांना आंतरुग्ण विभागात दाखल केले गेले. त्यापैकी ३ हजार १२६ रुग्णांचा मृत्यू झाला.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

२०२२ मध्ये ४ लाख ३१ हजार ५९८ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार झाले. त्यापैकी ३१ हजार १०८ रुग्ण दाखल झाले. तर उपचारादरम्यान १ हजार ९०१ रुग्ण दगावले. रुग्णालयात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत ३ लाख ५४ हजार २८९ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार झाले. त्यापैकी २९ हजार १२१ रुग्णांना दाखल केले गेले. त्यापैकी १ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सातत्याने येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते.

हेही वाचा… ‘सह्याद्री’त पुन्हा एकदा वाघांच्या पाऊलखुणा; वाघाच्या स्थलांतरणाचा मार्ग मोकळा !

२०२०- २१ मध्ये येथे औषधांवर ३ कोटी ७७ लाख ९ हजार ६२ रुपये, २०२१- २२ मध्ये येथे ७८ लाख २८ हजार ३५६ रुपये, २०२२- २३ मध्ये ४७ लाख ४३ हजार ४६२ रुपये, २०२३ मध्ये ऑक्टोबरपर्यंत ६६ लाख ७७ हजार १९२ रुपये खर्च करण्यात आल्याचेही माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. त्यामुळे एकीकडे येथे रुग्णसंख्या वाढली, तर दुसरीकडे औषधांचा खर्च कमी केल्याने अप्रत्यक्षरित्या रुग्णांची फरफटही झाल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

तीन वर्षांत साडेसहा हजार मृत्यू

मेयो रुग्णालयात २०२१ मध्ये ३ हजार १२६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०२२ मध्ये १ हजार ९०१ तर १ जानेवारी २०२३ ते ऑक्टोंबर २०२३ पर्यंत येथे १ हजार ४६३ रुग्णांचे मृत्यू झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले.

नवजात मृत्यू वाढले

मेयो रुग्णालयात २०२१ मध्ये १ हजार ७१४ सामान्य प्रसूती झाल्या. २०२२ मध्ये २ हजार १४ तर २०२३ मध्ये ऑक्टोबरपर्यंत १ हजार ९३० सामान्य प्रसूती झाल्या. तर २०२१ मध्ये येथे २ हजार १५१ सिझेरियन, २०२२ मध्ये २ हजार ७३६ सिझेरियन तर २०२३ मध्ये ऑक्टोबरपर्यंत २ हजार १८५ सिझेरियन झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले. तर येथे २०२१ मध्ये ३५ मातामृत्यू तर २०२२ मध्ये २८, २०२३ मध्ये ऑक्टोबरपर्यंत २० माता मृत्यू झाल्याचे पुढे आले. नवजात मृत्यूही येते २०२१ मध्ये ३३, २०२२ मध्ये २८, २०२३ मध्ये ऑक्टोबरपर्यंत ५३ झाल्याचे पुढे आले.