लोकसत्ता टीम

गडचिरोली : शासन-प्रशासनाकडून विकासाचा कितीही दावा केला जात असला तरी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात पावलोपावली या विकासाचे खरे रूप पाहायला मिळते. येथील आजारी नागरिकांना रुग्णालयापर्यंत पोचण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही खाटेवरून करावा लागणारा वेदनादायी प्रवास याची साक्ष देतो आहे. भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील या चित्रावरून नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला आहे.

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Gadkari alleged that officials of forest department responsible for stopping development of gadchiroli district
गडचिरोलीच्या विकासकामांना वन विभागाचा सर्वात मोठा अडथळा : नितीन गडकरी
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

नक्षलवादी कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या भागात अपुऱ्या आरोग्य सुविधेमुळे येथील नागरिक उपचारासाठी नेहमीच भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे येतात. मात्र, रस्ते व पुलांचा अभाव असल्याने जंगलातील पायवाटेने खाटेची कावड करूनच रुग्णांना दवाखान्यापर्यंत आणावे लागते.

आणखी वाचा-हजारो अपंग मुलांवर उपचार, नागपुरातील डॉ. शिंगाडे यांच्या कामाचा अमेरिकेत गौरव

छत्तीसगड राज्यातील मेटावाडा हे गाव डोंगराळ भागात आहे. या गावातील पुन्नी संतू पुंगाटी (१७) ही युवती मागील पाच दिवसांपासून तापाने आजारी होती. त्यामुळे या युवतीला तिच्या कुटुंबीयांनी खाटेवर टाकून सुमारे १८ किमीचा पायदळ प्रवास करीत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सध्या तिच्यावर लाहेरीत उपचार सुरू आहेत. मात्र, या भागात रस्ते व पुलांच्या अभावामुळे अनेकांना दवाखान्यापर्यंत येतानाच मरणयातना सहन कराव्या लागतात. याविषयी प्रशासन कायम दुर्गम परिसराचे कारण देऊन वेळ मारून नेत असले तरी किती अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन परिस्थितीची पाहणी केली हा देखील संशोधनाचा विषय आहे. मागील महिन्यात अश्याचप्रकारे दुचाकीला खाट बाधून त्यावर मृतदेह नेण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे समाजमाध्यमावर टीकेची झोड उठविण्यात आली होती.