लोकसत्ता टीम

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर चालकाने विश्रांती घेण्यासाठी उभ्या केलेल्या ट्रक मधील डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात गस्तपथक पोलिसांना यश आले आहे.

Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
rasta roko kudalwadi marathi news
पिंपरी : अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईला विरोध; कुदळवाडीतील व्यावसायिकांकडून रस्ता बंद
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
minor detained for stealing vehicles for fun 5 two wheelers two rickshaws seized
मौजमजेसाठी वाहन चोरी करणारा अल्पवयीन ताब्यात; पाच दुचाकी, दोन रिक्षा जप्त
youth attacked over parking dispute in pune
पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; तरुण गंभीर जखमी, बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील घटना
Police team arrests thief who tried to steal mobile phone at Thane railway station thane news
ठाणे रेल्वे स्थानकात ८० हजार रुपयांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; चोरट्याला पोलीस पथकाने केली अटक

समृद्धीवरील बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र दुसरबीड व उपकेंद्र फर्दापूर दरम्यान उभ्या असलेल्या जड वाहनातील डिझेल चोरणारांनी धुमाकूळ घातला आहे. महामार्गावर टोलनाक्यांचा आसरा घेत वाहन चालक हे रात्रीला आराम करण्यासाठी, आपले वाहन उभे करतात. वाहन चालकांना झोप लागल्यानंतर डिझेल टाकीचे ‘लॉक’ तोडून गाडीमधील डिझेल स्वयंचलीत मोटारपंपाच्या साह्याने पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्या स्वतःच्या कॅनमध्ये भरून चोरटे मोकळे होतात. इंधन चोरीच्या वाहनचालकांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यासाठी शोध मोहीम राबवूनही डिझेल चोर हाती लागत नव्हते.

हेही वाचा… बुलढाणा : तीन वर्षे शिक्षकाच्या घरी राहिले, कठोर मेहनत घेऊन ‘नीट’ मध्ये चमकले!

काल १४ जून रोजी रात्री ११.२५ वाजताच्या दरम्यान पोलिस पथकाची रात्रीची गस्त सुरु होती. समृद्धी महामार्ग चॅनेल क्र. ३१० जवळच्या पेट्रोल पंपानजीक डिघोळे यांच्या हॉटेलवर दोन जण चहापाणी करण्यासाठी थांबले होते. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार, कर्मचारी दिनकर राठोड, अरुण भुतेकर व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सचिन सनान्से, उमेश नागरे, चालक गणेश चाटे आदिंना एक स्कार्पिओ (एम. एच. १५ – ईबी – ०४८७) आढळून आली. गस्त चमूने त्यांची विचारपूस केली असता दोघांनी उडवाउडीची उत्तरे दिली. दुसऱ्या स्विफ्ट डिझायरच्या चालकाने पोलिसांना पाहताच जालना दिशेने भरधाव वेगात धूम ठोकली. त्यामुळे संशय आणखी बळावल्याने पोलीस पथकाने स्कार्पिओची तपासणी केली. तेंव्हा त्यात ३५ लिटर क्षमतेच्या पाच ते सहा रिकाम्या कॅन्स आढळून आल्या.

हेही वाचा… नागपूर : संघभूमी शेजारी ‘बीआरएस’चे शक्तिप्रदर्शन, कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

दोघांनीही आपण डिझेल चोरण्यासाठी आलो होतो, हे कबूल केले. त्यांची नावे शेख अल्ताफ शेख आयुब वय २४ वर्षे रा.दहेरकर वाडी, जुना जालना व मोहम्मद फैजान मोहम्मद रफीक वय २८ वर्षे राहणार संजयनगर, जुना जालना अशी आहे. पुढील तपास व कारवाईसाठी बीबी, ता. लोणार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महामार्ग पोलीस अधीक्षक, यशवंत सोळंके, नागपूर ह्यांनी गस्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच गस्त पथकाला योग्य ते बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

Story img Loader