करोनाकाळात आवश्यक कामासाठी विकासनिधी वळविण्यात आल्याने खासदारांना अडीच वर्षे विकासकामांवर खर्च करता आला नव्हता. आता विकासनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून तसे पत्र आल्यामुळे विकासकामांसाठी लोकांची झुंडब उडत आहे. निधीसाठी लोक खासदारांना लग्नसमारंभ आणि स्मशानभुमीतही गाठत असल्याने खासदार रामदास तडस भांबावून गेले आहे.
प्रत्येक खासदाराला विविध विकासकामांसाठी दरवर्षी पाच कोटी मिळतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत केंद्राने हा निधी दिला नाही. अन्य भत्ते आणि विकासनिधी करोना कामांसाठी खर्च करण्यात आला. आता निधी देणार असल्याचे पत्र आले आहे. हे कळताच लोक मिळेल तिथे खासदारास भेटून निधीसाठी अर्ज देत आहे. खासदार तडस दोन दिवसांपूर्वी अंत्यसंस्कारासाठी हिंगणघाटला गेले होते. तिथे स्मशानभुमीतही काही लोक पोहोचले. थक्क खासदारांनी काही तर भान ठेवा, असे नम्रपणे सांगत अर्ज स्वीकारणे टाळले. “परवा सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांचे निधन झाले, तिथे सांत्वन भेटीसाठी गेलो असता दोघांनी अर्ज दिले,” असे तडस यांनी सांगितले.
दोन वर्षांपासून निधी देऊ न शकल्याने कामाची मोठी यादी प्रलंबित आहे. पाच कोटी मिळणार असून साठ कोटी रुपये खर्चांच्या कामांची यादी तयार आहे. यामुळे कोणत्या कामांसाठी निधी द्यायचा, असा प्रश्न खासदारांचे खासगी सचिव विपीन पिसे यांनी उपस्थित केला. मतदारसंघात बावीसशे गावे आहेत. प्रत्येक गावास काही देतो म्हटले तर अकरा हजार रुपये एका गावाच्या वाट्यास येतात. खासदारांच्या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात, त्यासाठी पाच कोटी मिळतात तर एका विधानसभा मतदारसंघासाठी आमदारास पाच कोटी मिळतात, यामुळे निधीवाटपात आमदार सुखी असल्याचे म्हटले जाते.