लोकसत्ता टीम

बुलढाणा: मराठवाड्याच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातही कुणबी नोंदीची शोध व तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. या अंतर्गत निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, तत्कालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यात येत आहे.

आणखी वाचा-वर्धा: रेल्वे तिकिटाचा काळाबाजार! सीबीआय पथकाने केली एकास अटक

पडताळणी झाल्यावर पात्र व्यक्तीना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे. जिल्ह्यातील ६ उपविभागीय अधिकारी व १३ तहसिलदार यांना हे निर्देश देण्यात आले आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अथवा कुणबी याबाबतचे सन १९६७ पूर्वीचे कुणबी नोंदी पुरावे उपलब्ध असतील अशा विध्यार्थी, नागरिकांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलकडे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करावे लागणार आहे.

Story img Loader