चंद्रपूर: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर लोकांनी गर्दी केली. परिणामी शहरातील निम्मे पेट्रोल पंप एका रात्रीत कोरडे ठाक झाले. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना पेट्रोलसाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील मुल मार्गावरील पेट्रोल पंपावर ग्राहक व व्यवस्थापकांत शाब्दिक चकमक उडाली. यामुळे तणाव निर्माण झाला होता.
पेट्रोलअभावी आज स्कूल बसही बंद होत्या. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. सोमवारी रात्री ११ वाजतापर्यंत तसेच आज सकाळी सहा वाजपासून पेट्रोल पंपांवर गर्दी आहे.
हेही वाचा… खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याचे स्वांतत्र्य
जिल्हा परिषदेच्या शेजारी असलेला खजांची पेट्रोल पंप इंधन साठा संपल्याने रात्रीच बंद करण्यात आला. यामुळे आजुबाजूच्या पेट्रोल पंपांवर गर्दी दाटली. महाकाली मार्गावरील पंपही बंद होता. जिल्हा आणि शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर असे चित्र दिसून येत आहे.