गोंदिया : १४ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. गोंदिया जिल्ह्यातून कुणाचा नंबर लागणार ! गोंदिया जिल्ह्याच्या इतिहास नुसार जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री मिळणार की जिल्ह्यातील हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
गोंदिया जिल्हा करिता मागील अनुभव असा सांगतो की दुसऱ्या जिल्ह्यातील असलेला पालकमंत्री गोंदिया जिल्ह्यात फक्त २६ जानेवारी, १ मे महाराष्ट्र दिवस, १५ ऑगस्ट आणि जिल्हा नियोजन समितीची बैठकीला हजेरी लावतो उर्वरित वेळ पुरता दुर्लक्षित करतो. त्यामुळेच महायुतीतील मित्र पक्षांमध्ये यावरून चर्चा रंगली आहे. भाजप ,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) गट, शिवसेना (शिंदे) या तिन्ही पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष हे पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय अंतिम असेल, पण पालकमंत्री मात्र जिल्ह्यातीलच असावा या मताचे आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांचे मताचा कानोसा घेत जिल्ह्यातील एखाद्या आमदाराला मंत्री मंडळात स्थान देणार का? याकडे गोंदिया जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा…विद्यार्थ्यांसाठी ‘ रंगोत्सव ‘ तर शिक्षकांसाठी ‘ समृद्धी ‘ उपक्रम. प्रवासभत्ता, भोजन, निवास मोफत.
गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निवडून आले. यात भाजपचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या एका आमदाराचा समावेश आहे. निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षात समन्वय होते. त्यामुळेच महायुतीचा विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे पालकमंत्री भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस चा असे न म्हणता पालकमंत्री हा महायुतीचाच असणार असे तीनही पक्षाचे पदाधिकारी सांगत आहेत.
विधानसभा निवडणुका या महायुती म्हणून लढण्यात आल्या. पालकमंत्रिपदी कुणाची वर्णी लावावी हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे आम्ही त्यावर बोलणे योग्य नाही. पण जिल्ह्याच्या पुढील विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री हा गोंदिया जिल्ह्यातील असावा अशी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भावना आहे. येसूलाल उपराडे भाजपा ,जिल्हाध्यक्ष गोंदिया
हेही वाचा…पंतप्रधानांसाठी संमेलनाचे उद्घाटनस्थळ बदलणार? उद्घाटन विज्ञान भवनात, संमेलन तालकटोरा मैदानात
“गोंदिया जिल्ह्यातीलच पालकमंत्री असावा ही आमची भावना आहे. ” प्रेमलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गोंदिया ” पालकमंत्री कोण याचा निर्णय पक्ष श्रेष्ठी व वरिष्ठ नेते घेतील. तो जिल्ह्यातीलच असावा असे आमची भावना आहे. मुकेश शिवहरे, जिल्हाप्रमुख – शिवसेना (शिंदे), गोंदिया