नागपूर: पावसाळ्यात जमिनीतील खड्ड्यात पाणी शिरल्याने अनेक सरपटणारे प्राणी बाहेर निघतात. पण नागपुरात एका घरात शिरलेल्या घोरपडीमुळे घरमालकाची चांगलीच तारांबळ उडाली. घरमालकाने थेट घराबाहेर धूम ठोकली अन् पाहता पाहता लोकांनी तिकडे धाव घेत मोठी गर्दी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेसा चौक परिसरातील जगदीश अयाचित यांच्या घरात दुपारच्या सुमारास एक मोठी घोरपड शिरली. त्यामुळे घाबरलेल्या घरातील लोकांनी पळ काढला आणि लगेच सर्पमित्र शरद चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी घटनास्थळी पोहचून एका तासात घोरपड ताब्यात घेतली.

हेही वाचा… नागपूर: मृत्यूनंतरही सोडली नाही साथ, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही संपवली जीवनयात्रा

पशुचिकित्सक डॉ. सुजित कोलंगत आणि डॉ. मयूर पावशे यांनी घोरपडीची वैद्यकीय तपासणी केली. तिची प्रकृती उत्तम असल्याने नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी परवानगी देण्यात आली. सव्वा दोन किलोच्या साडे बारा फूट लांबीच्या घोरपडीला निसर्गमुक्त करण्यात आले. यावेळी गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत उपस्थित होते.