नागपूर: नागपूर येथील कोट्यवधी मानवतावादी जनतेचे प्रेरणास्थान असलेल्या “दीक्षाभूमी” येथे बाह्य शक्तींचा बौद्ध धम्माची जागतिक वास्तू असलेल्या स्थळावर सतत हस्तक्षेप सुरू असतो. या विरोधात अनेकदा नागपुरातील व महाराष्ट्रातील जनतेने आपली नाराजी व्यक्त केलेली असून त्याचा “परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती” वर काडीमात्र फरक दिसत नाही व ते सुद्धा सत्ताधारी लोकांचे बाहुले असल्याचा आरोप होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीक्षाभूमीचे रखडलेले बांधकाम, दीक्षाभूमीतील जागेचा आर्थिक मिळकती करीता सुरू असलेला वापर, सामाजिक व धम्म सोहळ्यांन करिता परवानगी न देणे, स्मारक समिती अंतर्गत असलेल्या कॉलेजचे ब्राह्मणीकरण, आर्थिक गैरव्यवहार, मागासवर्गीय विद्यार्थी व शिक्षकांची अवहेलना होणे व इतर ही बाबींमध्ये काही ठराविक विचारधारेच्या लोकांचा सतत हुकूमशाही कारभार सुरू असतो. इथे बौद्धांनांच स्वातंत्र निर्णय घेण्याचा व वागण्याचा अधिकार नसल्याचे आक्षेप नोंदविले तसेच समानतेचे, बुद्ध व आंबेडकरवादी विचारांचे विरोधक असणारे दीक्षाभूमी मध्ये आपली सर्रास अरेरावी चालत असल्याचे नमूद आंदोलकांनी केले व संपूर्ण आंबेडकरवादी लोकांनी या आर.एस.एस धार्जीनी, मनुवादी पिलावळींचा पवित्र दीक्षाभूमी मधून बंदोबस्त करावा या करीता मोठया संख्येने जनआंदोलन उभारावे असे आवाहन केले.

हेही वाचा… विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी…

सोबत स्मारक समितीचा सुद्धा निषेध दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर कॉलेज समोर संवैधानिक मार्गाने नारे-निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी युवा शहर अध्यक्ष प्रसन्ना दुरगकर, युवा जिल्हा अध्यक्ष मनीष बोरकर, रविबाबु शेंडे, संगीता गोधनकर, प्रतिमा शेंडे, विवेक वानखेडे, सुमेध गोंडाणे, प्रफुल्ल माणके, विवेक हाडके, यशवंत चव्हाण, संजय सूर्यवंशी, अनुमीत तिरपुडे, अंकुश मोहिले, विजय गोंडुळे, अमोल डोंगरवार, अभिजित पडगम, धम्मदिप लोखंडे, राहूल भिमटे व अनेक कार्यकर्ता उपस्थीत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People take to the streets alleging that the holy deekshabhoomi was being occupied by reactionaries in nagpur rbt 74 dvr
Show comments